अमिताभ बच्चन यांनाही आहे या गोष्टीचा फोबिया, पहिल्यांदाच नॅशनल टीव्हीवर सांगितली ही गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 10:46 IST2021-10-06T10:38:14+5:302021-10-06T10:46:25+5:30
भारतीय टीव्हीच्या इतिहासामधील सगळ्यात यशस्वी कार्यक्रम म्हणून 'कौन बनेगा करोडपती' नावारुपाला आला आहे.

अमिताभ बच्चन यांनाही आहे या गोष्टीचा फोबिया, पहिल्यांदाच नॅशनल टीव्हीवर सांगितली ही गोष्ट
बिग बींचा खास अंदाज आणि केबीसी शोचं स्वरुप यामुळे हा शो रसिकांचा लाडका शो बनला आहे. या शोनं अनेकांची स्वप्नं पूर्ण केली आहेत. भारतीय टीव्हीच्या इतिहासामधील सगळ्यात यशस्वी कार्यक्रम म्हणून 'कौन बनेगा करोडपती' नावारुपाला आला आहे. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. प्रश्नोत्तरे अशा स्वरुपात असलेल्या या शोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन स्पर्धकांशी त्यांच्या खास शैलीत संवाद साधताना दिसतात.
स्पर्धकही अगदी मनमोकळेपणाने त्यांच्याशी आपले सगळे प्रॉब्लेम शेअर करताना दिसतात. नुकत्याच झालेल्या भागात स्पर्धक मनीषा आपला संघर्ष अमिताभ यांच्याबरोबर शेअर करत होती. मनिषाला अंधाराची खूप भीती वाटत असल्याचे तिने सांगितले. तितक्यात अमिताभ यांनीही सांगितले की, त्यांनाही अंधाराची भीती वाटते.झोपताना लाईट ऑन करुनच बिग बी झोपतात असे त्यांनी सांगितले.
अमिताभ यांचे स्पर्धकासह असलेला संवाद ऐकताना प्रत्येकाला वेगळाच अनुभव देणारा असतो. आधीच स्पर्धक मोठ्या तणावात असतात. त्यांचे दडपण कमी करण्यासाठी अमिताभ अनेकदा स्पर्धकांच्या कुटुंबासह, स्पर्धकांसह दिलखुलास वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत सेटवरचे वातावरण हलके-फुलके करताना दिसतात.
अमिताभ बच्चन ७८ वर्षांचे आहेत. या वयातही ते एकदम हेल्दी-फिट आहेत.आरोग्याची उत्तम काळजी ते घेतात. स्वतःला ते खूप बिझी ठेवतात.या वयातही अभिनय करताना त्यांची एनर्जी इतरांनाही थक्क करणारी असते. तरुण आणि स्टार अभिनेत्यांना लाजवतील आजही अशीच त्यांची कामगिरी पाहायला मिळते.
लवकरच ट्रेकिंग वर आधारित हिंदी सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहे. या सिनेमाविषयी अधिक माहिती समोर आलेली नसली तरी खुद्द बिग बी यांनीच ट्रेकिंगवर आधारित सिनेमा ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी सिनेमातून अमिताभ यांची वेगळीच भूमिका चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. खुद्द बिग बी या सिनेमासाठी फार उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.