"मी तुझ्याशी कितीही वाईट वागले तरीही...", मास्तरीण बाईंसाठी भुवनेश्वरीची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 03:35 PM2023-10-28T15:35:09+5:302023-10-28T15:35:40+5:30

'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेत अक्षरा हे मास्तरीण बाईंचं पात्र साकारणाऱ्या शिवानी रांगोळेचा आज वाढदिवस आहे.

kavita medhekar shared special post for shivani rangole on her birthday | "मी तुझ्याशी कितीही वाईट वागले तरीही...", मास्तरीण बाईंसाठी भुवनेश्वरीची खास पोस्ट

"मी तुझ्याशी कितीही वाईट वागले तरीही...", मास्तरीण बाईंसाठी भुवनेश्वरीची खास पोस्ट

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. 'बन मस्का', 'आम्ही दोघी', 'सांग तू आहेस का' अशा अनेक मालिकांमध्ये काम करून शिवानीने अभिनयाचा ठसा उमटवला. 'शेजारी शेजारी पक्के शेजारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शिवानीने अल्पावधीतच कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या ती झी वाहिनीवरील तुला शिकवीण चांगलाच धडा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेत अक्षरा हे मास्तरीण बाईंचं पात्र साकारणाऱ्या शिवानी रांगोळेचा आज वाढदिवस आहे. शिवानीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या ऑनस्क्रीन सासूबाईंनी खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री कविता मेढेकर यांनी शिवानीबरोबर त्यांचा सेटवरील फोटो शेअर केला आहे. कविता मेढेकर या मालिकेत शिवानीची सासू म्हणजेच भुवनेश्वरी ही भूमिका साकारत आहेत. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

"स्क्रिनवर मी तुझ्याशी कीतीही वाईट वागले तरीही तुला माहितीये प्रत्यक्ष आयुष्यात I love you. तू आहेस तशीच राहा. नेहमी आनंदी राहा आणि let’s rock “तुला शिकवीन चांगलाच धडा’’...वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवानी," असं कविता मेढेकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर शिवानीने "मला माहीत आहे...खूप प्रेम", अशी कमेंट केली आहे. 

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. शिवानीने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सुभेदार' या चित्रपटात ती ऐतिहासिक भूमिकेत झळकली होती.

Web Title: kavita medhekar shared special post for shivani rangole on her birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.