करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल पुन्हा एकत्र आले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 13:38 IST2017-03-10T08:08:45+5:302017-03-10T13:38:45+5:30

करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल दोघे बिग बॉसमध्ये एकत्र झळकले होते. बिग बॉसच्याच घरात त्या दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली ...

Karisma Tanna and Upen Patel came together again? | करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल पुन्हा एकत्र आले?

करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल पुन्हा एकत्र आले?

िश्मा तन्ना आणि उपेन पटेल दोघे बिग बॉसमध्ये एकत्र झळकले होते. बिग बॉसच्याच घरात त्या दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरात असताना उपेनने करिश्माला प्रपोजदेखील केले होते. त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या फॅन्सना खूप आवडत असे. त्यांचे फॅन्स त्यांना प्रेमाने उपमा असे म्हणत. ते दोघे अनेक ठिकाणी हॉलिडेला जात असत आणि तिथले फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट करत असत. या सगळ्यामुळे त्यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा मीडियात होत होती. त्या दोघांनी मिळून एमटिव्ही लव्ह स्कूल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील केले होते. पण अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी बेक्र अप करण्याचा निर्णय घेतला. 
करिश्मा आणि उपेनच्या प्रेमकथेप्रमाणेच त्यांच्या ब्रेकअपचीदेखील चांगलीच चर्चा झाली होती. कारण या दोघांमध्ये प्रचंड भांडणे झाल्यामुळे त्या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला होता. अंधेरीतील एका मल्टीप्लेक्सच्यासमोर तर त्यांच्यात प्रचंड वाद झाले होते. त्यावेळी त्या दोघांनीही एकमेकांना खरे-खोटे सुनावले होते. या घटनेनंतर ते दोघे कुठेच एकत्र पाहायला मिळाले नव्हते. पण नुकतेच त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहाण्यात आले आहे.
उपेन आणि करिश्माच्या फॅन्ससाठी खूप चांगली बातमी आहे. त्यांना नुकतेच वांद्र्यातील एका हॉटेलमध्ये एकत्र पाहाण्यात आले. ते दोघे तिथे खूप वेळ होते. तसेच तिथे ते एकाच कारमधून आले आणि एकाच कारमधून परत गेले असे उपस्थितांचे म्हणणे आहे. पण फोटोग्राफर्सना पाहाताच दोघांनीही ते दोघे वेगवेगळे आले असल्याचे दाखवत एकमेकांकडे दुर्लक्ष केले.  

Also read : बिग बॉसमधील या प्रेमकथांचे काय झाले?

Web Title: Karisma Tanna and Upen Patel came together again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.