तर 'या' कारणामुळे कपिलने राणी मुखर्जीच्या शोचे शूट केले कॅन्सल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 16:36 IST2018-03-29T11:06:16+5:302018-03-29T16:36:16+5:30

काही महिन्यांच्या ब्रेकनंतर कपिलने शर्माने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक केला खरा पण कपिलने पुन्हा जुनेच धडे गिरवायला सुरुवात ...

Kapil then shoots Rani Mukherjee's show 'Kansal' for this reason | तर 'या' कारणामुळे कपिलने राणी मुखर्जीच्या शोचे शूट केले कॅन्सल

तर 'या' कारणामुळे कपिलने राणी मुखर्जीच्या शोचे शूट केले कॅन्सल

ही महिन्यांच्या ब्रेकनंतर कपिलने शर्माने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक केला खरा पण कपिलने पुन्हा जुनेच धडे गिरवायला सुरुवात केली. ‘फॅमिली टाईम विद कपिल शर्मा’ या शोमध्ये प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री राणी मुखर्जी 'हिचकी'च्या प्रमोशनसाठी आली होती. मात्र कपिल शर्माने ऐनवेळी शूटिंग कॅन्सल केली. यानंतर पुन्हा एकदा कपिल शर्मावर चारही बाजूने टीका व्हायला लागली. यावर नाही कपिलने अद्याप स्पष्टीकरण दिले नाही मेकर्सनीय उत्तर दिले. 

याआधी देखील 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या शोमध्ये अनेक स्टार्सना सेटवरुन शूट न करताच परत जाण्याची वेळ आली होती. कपिलच्या एक जवळच्या मित्राने  zoom ला दिलेल्या इंटरव्हुमध्ये सांगितेल की, जेव्हा कपिल शूटसाठी आला नाही तेव्हा त्याच्या मोबाईवर कॉल करण्यात आला मात्र त्याचा फोन बंद होता. त्यानंतर मग गिनीच्या फोनवर कॉल करण्यात आला आणि कपिलशी संपर्क झाला. जेव्हा कपिलला विचारण्यात आले त्यावर त्याने उत्तर दिले माझी शूट करण्याची इच्छा नाही. कपिलच्या मित्राने सांगितले कि चॅनेलकडून मिळत असलेल्या वागणुकीवरुन तो नाराज आहे. चॅनेलदेखील कपिलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ही कपिलने इच्छा नाही हेच कारणा सांगितले. कपिलच्या मित्राने पुढे हेही सांगितले की कपिल आणि त्याची गर्लफ्रेंड गिनी यांच्या नात्यात सध्या तणाव सुरु आहे.     

ALSO READ :  ट्विटर काय आता केवळ खुलासे देण्यासाठीचं उरलयं? कपिल शर्माचा संतप्त सवाल

गतवर्षभरात कपिल कायम चुकीच्या कारणाने चर्चेत आहे. आधी सुनील ग्रोवरसोबत कपिलचा वाद झाला होता. या वादानंतर सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी अचानक घसरला. त्यातून कसाबसा सावरत नाही, तोच कपिलला  आजारपणाने  घेरले. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले. अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला. यानंतर कपिलने ‘फिरंगी’ हा चित्रपटातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा हा चित्रपटही जोरात आपटला होता. 

Web Title: Kapil then shoots Rani Mukherjee's show 'Kansal' for this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.