कपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड प्रिती सिमोसने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 12:56 IST2017-03-30T07:26:01+5:302017-03-30T12:56:01+5:30

काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माने त्याची गर्लफ्रेंड गिनीचा फोटो टाकून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.''गिनी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'' ...

Kapil Sharma's X-girlfriend Preity Simos has made a shocking disclosure | कपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड प्रिती सिमोसने केला धक्कादायक खुलासा

कपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड प्रिती सिमोसने केला धक्कादायक खुलासा

ही दिवसांपूर्वीच कपिल शर्माने त्याची गर्लफ्रेंड गिनीचा फोटो टाकून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.''गिनी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'' अशी पोस्ट टाकत त्याने सोशल मीडियावर गिनीविषयी असलेले त्याचे प्रेम जाहीर केले होते. मात्र आता हा किस्सा इथेच थांबला नसून कपिलच्या या पोस्टनंतर   कपिलची एक्स गर्लफ्रेंड प्रिती सिमोसने कपिलविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे.सुनील ग्रोवर आणि कपिलच्या वादानंतर सुनील ग्रोवर,अली असगर, चन्दन प्रभाकर यांनी शो सोडला. आता त्या पाठोपाठ कपिलची क्रिएटीव्ह टीमनेही कपिलला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.कपिलचा शोची पोस्ट प्रोडक्शनचा कारोभार कपिलची एक्स गर्लफ्रेंड प्रितीने या शोला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रितीचे काम तिची बहिण निती सांभाळत आहे.त्यामुळे कलाकरांचे टाटा बाय बाय केल्यानंतर गेला आठवड्यात कॉमेडीयन सुनील पॉल, राजीव श्रीवास्तव आणि अहसान कुरैशी यांच्यासह शूट करत वेळ मारून नेल्याचे स्पष्ट झाल्याचे होते. मात्र असे किती दिवस चालणार यानुसार चॅनल हा शो बंद करण्याचा विचारात असल्याचे कळतंय.कपिल आणि त्याच्या टीममध्ये आॅस्ट्रेलियाच्या सिडनी येथेच वादाची ठिणगी पडली. कारण यावेळी चंदनला कपिलचा बोलण्याचा सूर अजिबात आवडला नाही. तो उद्धटपणे बोलत असल्याचे चंदनला वाटत होते. त्यामुळे त्याने लगेचच याविषयी कपिलला बजावून सांगितले.गेल्या आठवडाभरापासून कपिल शर्मा अन् त्याच्या टीममधील वाद जोरदार गाजत आहे. विमानात कपिलने नशेत त्याचा सहकारी सुनील ग्रोव्हर याला केलेली मारहाण, तसेच चंदन प्रभाकर याला दिलेल्या शिव्यांमुळे ‘कपिल शर्मा द कॉमेडी नाइट’ हा शो वादाच्या भोव-यात सापडला आहे.          

Web Title: Kapil Sharma's X-girlfriend Preity Simos has made a shocking disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.