​कपिलचा नवा शो लवकरच बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 22:32 IST2016-04-26T17:02:15+5:302016-04-26T22:32:15+5:30

कॉमेडी किंग कपिल शर्माचा नवा शो 23 एप्रिलपासून सुरू झाला आणि त्याच्या चाहत्यांना आनंदाचे भरते आले. दादी, गुत्थी, राजू, ...

Kapil Sharma's new show soon? | ​कपिलचा नवा शो लवकरच बंद?

​कपिलचा नवा शो लवकरच बंद?

मेडी किंग कपिल शर्माचा नवा शो 23 एप्रिलपासून सुरू झाला आणि त्याच्या चाहत्यांना आनंदाचे भरते आले. दादी, गुत्थी, राजू, पलक अशा आपल्या लाडक्या पात्रांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार, त्यांच्या अतरंगीपणामुळे पोट धरून हसायला मिळेल या विचारांनी सर्वच जण टीव्ही सेटसमोर आठवणीने ठाण मांडून बसले होते.

परंतु चाहत्यांचा आनंद फार काळ टिकणार नसल्याचे चिन्हे दिसत आहेत. एका वृत्तसंस्थेने दैनिकाच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार. पण घाबरू नका. कारण शो वाईट आहे किंवा कपिलचे चॅनलेशी पुन्हा भांडण झाले म्हणून शो रद्द करण्यात येणार नाहीए.

या नव्या शोची संकल्पना पूर्वीपेक्षा वेगळी आहे. पहिल्या १३ आठवड्यानंतर शोचे पहिले पर्व संपणार आहे. त्यानंतर काही महिन्यांच्या काळाने पुन्हा नवीन पर्व सुरू केले जाणार असल्याची प्राथमिक माहित आहे. म्हणजे ‘कॉमेडी नाईट्स वुईथ कपिल’ प्रमाणे वर्षानुवर्षे लगातार हा नवा शो चालणार नाही.

चला कपिल काही तरी नवीन करत आहे म्हटल्यावर आपण त्याचे स्वागतच केले पाहिजे. प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळू दे एवढीच आमची इच्छा आहे.

Web Title: Kapil Sharma's new show soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.