कपिलची हिरोईन सुमोना चक्रवर्ती या ठिकाणी करते व्हॅकेशन एन्जॉय,बिकनीमध्ये केले फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 13:29 IST2018-01-24T07:59:45+5:302018-01-24T13:29:45+5:30

'द कपिल शर्मा'मध्ये कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत रसिकांना आपल्या विनोदाने लोटपोट करणारी सुमोना चक्रवर्ती सध्या गोव्यामध्ये मस्त हॉलिडे एन्जॉय करतेय.सुमोनाने ...

Kapil Hiroain Sumona Chakraborty performs Venkaton Joy, a photo sharing done in Bikini | कपिलची हिरोईन सुमोना चक्रवर्ती या ठिकाणी करते व्हॅकेशन एन्जॉय,बिकनीमध्ये केले फोटो शेअर

कपिलची हिरोईन सुमोना चक्रवर्ती या ठिकाणी करते व्हॅकेशन एन्जॉय,बिकनीमध्ये केले फोटो शेअर

'
;द कपिल शर्मा'मध्ये कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत रसिकांना आपल्या विनोदाने लोटपोट करणारी सुमोना चक्रवर्ती सध्या गोव्यामध्ये मस्त हॉलिडे एन्जॉय करतेय.सुमोनाने गोव्यामध्ये एन्जॉय करतानाचे काही फोटोज सोशल मीडियावर शेयर केले आहेत.शेअर केलेल्या फोटोत तिने रेड कलरच्या बिकिनी घातल्याचे पाहायाला मिळतंय.या फोटोत तिचा आगदी हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.सुमोनाने फोटो शेअर करताच तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळत आहे.एरव्ही द कपिल शर्मा शोमध्ये सुमोनाचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळाला होता. रेड कलरच्या बिकनीत सुमोनाचा अंदाज तितकाच घायाळ करणारा आहे.तिचा हा रेड अंदाज चाहत्याच्या पसंती उतरत आहेत.विशेष म्हणजे सुमोनाने पहिल्यांदाच बिकनी अंदाज समोर आला असे नसून या आधीही तिने हॉट लूकमध्ये क्लिक केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.सुमोनाने तिच्यापेक्षा ११ वर्षांनी मोठा तिचा ब्रॉयफ्रेंड सम्राट मुखर्जीसह लग्न केले आहे.सम्राटनेही ‘भाई भाई’ व ‘सिकंदर सडक का’ या सिनेमात त्याने काम केले आहे.सध्या सम्राटने बंगाली सिनेमावर त्याने लक्ष केंद्रीत केले आहे.रिअल लाईफमध्ये अतिशय बिनधास्त असलेल्या सुमोनाचे गौरव चोपडा आणि अभिनव शुक्ला यांच्यासोबतही नाव जुळले होते.कपिल शर्मा शोमुळेच सुमोना प्रकाशझोतात आली होती.          

Also Read:मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय हा टीव्ही अभिनेता,समोर आले फोटो

सुमाना प्रमाणेच आणखी एक टीव्ही अभिनेता गौरव खन्ना त्याच्या पत्नीसह व्हॅकेशन एन्जॉय करतायेत.नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढत गौरव पत्नीसह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.गौरवचे हे रिअल लाईफ फोटो जितके त्याच्या चाहत्याच्या पसंती उतरत आहेत. तितकेच त्याचे ऑनस्क्रीन कामही रसिकांना भावतंय. गौरव खन्ना राजपुत्र विरेंद्र सिंग तर क्रितिका कामरा 'चंद्रकांता' ही भूमिका साकारत आहे. मालिकेतील क्रितिका आणि गौरवची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. गौरवने टीव्हीवरील अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2006 साली भाभी या मालिकेपासून केली होती. त्यानंतर त्याने 'कुमकुम','जमेगी जोडी डॉट कॉम','मेरी डोली तेरे अंगना','जीवनसाथी','ये प्यार ना होगा कम','दिल से दिया वचन','ससुराल सिमर का' अशा विविध मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.सध्या 'तो प्रेम या पहेलीः चंद्रकांता' या मालिकेत भूमिका साकारत आहे.मात्र आता गौरवच्या अभिनयासोबतच त्याच्या रोमँटिक विकेंडची जोरदार चर्चा रंगली आहे.  

Web Title: Kapil Hiroain Sumona Chakraborty performs Venkaton Joy, a photo sharing done in Bikini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.