कपिल बनणार ‘कप्पू’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 20:43 IST2016-04-14T03:43:29+5:302016-04-13T20:43:29+5:30
‘दी कपिल शर्मा शो’बद्दल प्रेक्षकांना जितकी आतूरता आहे, तितकीच या शोमधील वेगवेगळे कलाकार साकारणार असलेल्या पात्रांविषयी उत्सूकता आहे. ...

कपिल बनणार ‘कप्पू’
‘ ी कपिल शर्मा शो’बद्दल प्रेक्षकांना जितकी आतूरता आहे, तितकीच या शोमधील वेगवेगळे कलाकार साकारणार असलेल्या पात्रांविषयी उत्सूकता आहे. खुद्द किंगखान शाहरूख हा शो प्रमोट करीत आहे. शिवाय शोचे काही इनसाईड फोटोही बाहेर आले आहेत. यामुळे या शोबद्दलची उत्सूकता वाढली आहे. कपिल शर्मा यात कुठल्या भूमिकेत दिसणार, याबद्दलही लोकांना उत्सूकता आहे. तेव्हा आम्ही तुमची ही उत्सूकता काही प्रमाणात शमवू इच्छितो. ‘कॉमेडी नाईट्स विद कपिल’मध्ये बिट्टू शर्माचे कॅरेक्टर साकारून प्रसिद्धी झोतात आलेला कपिल शर्मा आपल्या नव्या शोमध्ये ‘कप्पू’चे कॅरेक्टर साकारणार आहे. जुन्यामध्ये दादीची भूमिका साकारणाºया अली असगरचा नातेवाईक म्हणून कप्पू या शोमध्ये दिसणार. शांतिवन नॉन कोआॅपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीत तो राहिल.शातीवनमध्ये शिफ्ट झाल्यानंतर कप्पूच्या आयुष्यात शांती यावी, असे सगळ्यांना वाटत असते. पण हे कठीणच नाही तर अशक्य होऊन बसते. असगर नव्या शोमध्ये हाफ-ब्लार्इंड लेडीचा रोल प्ले करणार आहे. गुत्थीचे पॉपुलर कॅरेक्टर प्ले करणारा सुनील ग्रोवर नव्या शोमध्ये डॉक्टर गुलाटीची भूमिका साकारणार आहे. तर जुन्या शोमध्ये कपिलची पत्नी बनलेली सुमोना चक्रवर्ती गुलाटीच्या क्लिनिकमध्ये काम करताना दिसेल. कप्पूवर मरणारी मुलगी असे तिचे कॅरेक्टर असेल. तर बिग बॉस९ फेम रोशेल मारिया राव गुलाटीची हॉट नर्स बसलेली दिसेल. कपिलचा नोकर चंदन प्रभाकर नव्या शोमध्ये चायवाला बनणार आहे. याशिवाय जुन्या शोमध्ये पलक व लच्छा बनलेला किकू या शोमध्ये अनेक कॅरेक्टर्स प्ले करताना दिसेल.