कनिका कपूरची ह्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 08:40 PM2019-01-14T20:40:00+5:302019-01-14T20:40:00+5:30

'द व्हॉइस' हा अतिशय उत्सुकतेने प्रतीक्षा केला जाणारा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम लवकरच स्टार प्लस वाहिनीवर दाखल होणार आहे.

Kanika Kapoor's selection as an examiner in this program | कनिका कपूरची ह्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून निवड

कनिका कपूरची ह्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून निवड

googlenewsNext
ठळक मुद्दे‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात कनिका कपूर परीक्षकाच्या भूमिकेत'द व्हॉइस' लवकरच स्टार प्लस वाहिनीवर होणार दाखल

देशातील अत्यंत सुरेल आवाज कोणाचा, याचा शोध घेणारा 'द व्हॉइस' हा अतिशय उत्सुकतेने प्रतीक्षा केला जाणारा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम लवकरच स्टार प्लस वाहिनीवर दाखल होणार आहे. या कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय आवृत्त्यांनी या कार्यक्रमाच्या केलेल्या प्रसिद्धीस साजेसे गायक या कार्यक्रमाशी निगडीत करण्यात येत आहेत. त्यानुसार लोकप्रिय गायिका कनिका कपूर हिची आता या कार्यक्रमात एक परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाशी निकटचा संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात एक परीक्षक म्हणून काम पाहण्यास कनिका कपूरने अनुमती दिली आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांना एक मार्गदर्शक या नात्याने ती उत्तम गाणे कसे गायचे, यासंबंधीच्या केवळ टिप्स देईल असे नव्हे, तर गाण्याचे उत्कृष्ट सादरीकरण कसे करायचे, हेही शिकवणार आहे.”
आजवर आपल्या गाण्यांच्या लोकप्रियतेने नवनवे उच्चांक नोंदविलेली ही गायिका कनिका कपूर आता परीक्षकाच्या एका अगदी नव्या भूमिकेत पाहायला मिळणार असून ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात ती आणखी कशाप्रकारे योगदान देईल, त्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. यात देशातील अल्टिमेट व्हॉईसचा शोध घेण्यात येणार आहे. या शोमध्ये कनिका कपूरसह ए.आर. रेहमान यांच्यासारखे सिंगिग क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती परीक्षक म्हणून दिसणार आहेत. 

Web Title: Kanika Kapoor's selection as an examiner in this program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.