'कमळी' मालिका उत्कंठावर्धक वळण, सरोज आणि कमळीची भेट होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:12 IST2025-10-30T18:11:40+5:302025-10-30T18:12:27+5:30
'Kamali' series : कमळीचा प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे. साध्या पार्श्वभूमीतून आणि गावाकडून आलेली कमळी आज स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडत आहे.

'कमळी' मालिका उत्कंठावर्धक वळण, सरोज आणि कमळीची भेट होणार का?
कमळीचा प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे. साध्या पार्श्वभूमीतून आणि गावाकडून आलेली कमळी आज स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिने हार मानली नाही. तिचा आत्मविश्वास, धैर्य आणि प्रामाणिकपणा यामुळे प्रेक्षकांच्या मनात ती खास स्थान मिळवत आहे. या आठवड्यातील भागांमध्ये कमळीच्या आयुष्यात काही नवे वळण येणार आहे, जे तिच्या संघर्षाला आणि नात्यांना अधिक गहिरं करतील.
सरोज आणि ऋषी यांची अनपेक्षित भेट होणार आहे आणि योगायोगाने ती नयनताराच्या घरी राहायला लागलेय. स्वयंपाकघरात मदत करू लागलेय आणि हळूहळू घरातील लोकांच्या मनात जागा बनवते. सरोजच्या कामामुळे नयनतारा प्रभावित होते आणि आभार म्हणून ती कमळी आणि अन्नपूर्णा आज्जी सोबत संपूर्ण कुटुंबाला डिनरसाठी आमंत्रित करते. ही भेट पुढील घटनांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. डिनरच्या वेळी कमळी, सरोज आणि राजन एकाच छताखाली येणार आहेत. जेवणाच्या चवीवरून राजनला काहीतरी ओळखीचं जाणवतं, पण कोडे अजून सुटत नाहीये. दरम्यान अनिका आणि नयनतारा हृषीसमोर डाव रचते, या सर्व घडामोडींमुळे घरात तणाव निर्माण होतो.
नयनताराच्या विचारांच्या विरोधात कमळी
दरम्यान, प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवा गोंधळ निर्माण होतो. अनिकाला पार्टीला बोलावलं जात नाही, त्यामुळे तिच्या मनात राग आहे. हा क्षण मालिकेतील एक निर्णायक टप्पा ठरतो कारण हाच तो क्षण आहे जेव्हा नयनतारा आणि कमळीचा पहिला आमनासामना होणार आहे. आपल्या आत्मसन्मानासाठी आणि प्रियजनांसाठी लढणारी कमळी आता नयनताराच्या विरोधात उभी राहते. पुढे जाऊन या संघर्षाचं रूप अधिक तीव्र होणार आहे. आता सरोज आणि कमळीची भेट होईल का? नयनतारा, कमळीला कसे उत्तर देणार? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.