ज्योती सुभाष यांनी घेतला काही दिवसांचा ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 13:46 IST2016-10-28T13:46:26+5:302016-10-28T13:46:26+5:30

ज्योती सुभाष गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीचा भाग आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सगळ्याच ...

Jyoti Subhash took a few days break | ज्योती सुभाष यांनी घेतला काही दिवसांचा ब्रेक

ज्योती सुभाष यांनी घेतला काही दिवसांचा ब्रेक

योती सुभाष गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीचा भाग आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सगळ्याच भूमिकांचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची मुलगी अमृता सुभाषनेदेखील मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील ती तितकीच प्रसिद्ध आहे. 
ज्योती सुभाष सध्या बन मस्का या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मालिकेत त्या एक महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. त्यांनी या मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. प्रेक्षक भेटल्यावर आवर्जून त्यांच्या या भूमिकेचे कौतुक करतात. ज्योती सुभाषदेखील आपल्या फॅन्सना कधीच नाराज करत नाहीत. त्या कितीही व्यग्र असल्या तरी या मालिकेेचे चित्रीकरण करतात. आता तर त्या अमेरिकेत असूनही या मालिकेपासून दूर राहू शकलेल्या नाहीत. आपण काही दिवसांसाठी अमेरिकेला जाणार आहोत याची त्यांना खूप आधीपासून कल्पना असल्याने त्यांनी या मालिकेच्या अनेक भागांचे अॅडव्हान्समध्ये चित्रीकरण केले आहे.
ज्योती सुभाष यांचा मोठा मुलगा अमेरिकेत राहातो. त्यामुळे काही दिवसांसाठी त्या आपल्या मुलाकडे राहायला गेल्या आहेत. ज्योती सुभाष अमेरिकेला गेल्यावर त्या मालिकेत काही दिवस दिसणार नाहीत असेच सगळ्यांना वाटत होेते. पण त्या आपल्या कामाच्या बाबतीत प्रचंड परफेक्ट आहेत. त्यामुळे त्यांनी अमेरिकेला जाण्याआधी अनेक भागांचे चित्रीकरण केलेले आहे. त्यामुळे मालिकेच्या टीमकडे खूप साऱ्या भागांची बँक असल्याने त्या अमेरिकेत असल्या तरी प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहेत. 

Web Title: Jyoti Subhash took a few days break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.