सबसे बडा कलाकारमध्ये जॉनी लिव्हर आणि मुलगी जॅमी लिव्हर यांची जुगलबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 15:29 IST2017-06-15T09:55:31+5:302017-06-15T15:29:26+5:30
सबसे बडा कलाकार या कार्यक्रमात जय भानुशाली आणि जॅमी लिव्हर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर या ...
सबसे बडा कलाकारमध्ये जॉनी लिव्हर आणि मुलगी जॅमी लिव्हर यांची जुगलबंदी
स से बडा कलाकार या कार्यक्रमात जय भानुशाली आणि जॅमी लिव्हर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर या कार्यक्रमात अर्शद वारसी, रवीना टंडन आणि बोनम इराणी परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. या कार्यक्रमात सूत्रसंचालक असलेली जॅमी ही प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर यांची मुलगी आहे. जॅमीने लंडनमधील एका युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंगचे धडे गिरवले आहेत. त्यानंतर ती तिथल्या एका कंपनीत नोकरी देखील करत होती. पण तिला स्टँडअप कॉमेडी करण्यात रस आहे, असे तिचे सतत वाटत असल्याने तिने नोकरी सोडली. जॅमीने या क्षेत्रात येऊ नये असे जॉनी लिव्हर यांचे म्हणणे होते. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. विनोदाच्या क्षेत्रात कारकिर्द करण्यासाठी वडिलांनी एक तरी संधी तिला द्यावी असे तिचे म्हणणे होते. लंडनमध्ये जॉनी लिव्हरने शो करत असताना जॅमीला त्या कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडी करण्याची संधी दिली. तिथे तिने तिचा परफॉर्मन्स सादर केला आणि तिच्या वडिलांनादेखील तो आवडला. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमातील तिचे स्कीट तर प्रेक्षकांना प्रचंड आवडले. तिला या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने ब्रेक दिला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
जॉनी लिव्हरने नुकतीच सबसे बडा कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावली होती. जॉनी आणि जॅमी हे पहिल्यांदाच कोणत्याही कार्यक्रमात झळकले होते. जॉनी लिव्हर आवर्जून हा कार्यक्रम पाहतात. त्यांना या कार्यक्रमातील लहान मुलांचे स्कीट खूप आवडतात असे त्यांनी सांगितले. त्याचसोबत त्यांची मुली सबसे बडा कलाकार या कार्यक्रमात चांगले काम करत असल्याचे ते सांगतात.
![johny lever daughter]()