​जिजाजी छतपर हैं मालिकेला दादासाहेब फाळके अवॉर्डसमध्ये मिळाले हे पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 16:53 IST2018-05-04T11:21:25+5:302018-05-04T16:53:50+5:30

छोट्या पडद्यावरील अत्यंत लाडके ऑन स्क्रीन जोडपे हिबा नवाब (इलायची) आणि निखिल खुराना (पंचम) यांनी जिजाजी छत पर है ...

Jijaji Rooftop is the award that got the Dadasaheb Phalke Award | ​जिजाजी छतपर हैं मालिकेला दादासाहेब फाळके अवॉर्डसमध्ये मिळाले हे पुरस्कार

​जिजाजी छतपर हैं मालिकेला दादासाहेब फाळके अवॉर्डसमध्ये मिळाले हे पुरस्कार

ट्या पडद्यावरील अत्यंत लाडके ऑन स्क्रीन जोडपे हिबा नवाब (इलायची) आणि निखिल खुराना (पंचम) यांनी जिजाजी छत पर है या कार्यक्रमात आपल्या परफॉर्मन्सद्वारे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत आणि त्यांना पाहत राहावे असे वाटू लागले आहे. प्रेक्षकांनी या दोघांवर प्रचंड सकारात्मक प्रतिसाद आणि कौतुकाची उधळण केली असून अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारांनी आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला आहे.
हिबा नवाब आणि निखिल खुराना यांना छोट्या पडद्यावरील सर्वोत्तम ऑन स्क्रीन जोडपे या पुरस्काराने आणि अनुप उपाध्याय यांना सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार या पुरस्कारांनी गौरवण्यात आल्यावर जिजाजी घर पर है च्या कलाकारांना आकाश ठेंगणे झाले. या कलाकारांचे टॅलेंट आणि मेहनत हेच या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमधून सिद्ध होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपला आनंद व्यक्त करताना हिबा नवाब ऊर्फ इलायची सांगते, "मला बेस्ट ऑन स्क्रीन कपलचा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला आहे. जिजाजी छतपर है हा एक असा शो आहे जो माझ्यासाठी खूप जवळचा आहे आणि माझ्यावर इतके प्रेम करण्यासाठी माझ्या चाहत्यांचे मी खूप आभार मानते."
अत्यंत आनंदात असलेला निखिल खुराना ऊर्फ पंचम सांगतो, "दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. अधिक मेहनत करून माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आता मला अधिक रोमांचित आणि उत्साही वाटते आहे." हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनुप उपाध्याय ऊर्फ मुरारी सांगतो, "मला जिजाजी घर पर है साठी हा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद आणि गौरव वाटत आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. कारण ही मालिका माझ्यासाठी खूप खास आहे. यासारखे पुरस्कार मला माझ्या कलाकृतीवर आणि आम्ही काय करतो आणि कशासाठी करतो यावर अधिकाधिक विश्वास ठेवण्यास प्रेरित करतात. मला अधिक मेहनत करून माझ्या प्रेक्षकांचे अधिकाधिक मनोरंजन करायचे आहे."

Also Read : ​‘जिजाजी छत पर है’ या मालिकेत दिला जाणार हा सामाजिक संदेश

Web Title: Jijaji Rooftop is the award that got the Dadasaheb Phalke Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.