Jhalak Dikhhla Jaa Season 10: युवराज सिंगपासून हरभजन सिंगपर्यंत, झलक दिखला जा-10 मध्ये थिरकणार 'हे' 4 दिग्गज क्रिकेटर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 13:51 IST2022-07-20T13:49:25+5:302022-07-20T13:51:01+5:30
खरे तर हे चारही क्रिकेटर्स केवळ क्रिकेटमध्येच नाही, तर डान्समध्येही मास्टर आहेत.

Jhalak Dikhhla Jaa Season 10: युवराज सिंगपासून हरभजन सिंगपर्यंत, झलक दिखला जा-10 मध्ये थिरकणार 'हे' 4 दिग्गज क्रिकेटर?
टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध सेलेब्रिटी रियालिटी डान्स शो 'झलक दिखला जा' 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मेकर्स शोमध्ये एंटरटेनमेन्टची लेव्हल वाढविण्यासाठी कसून कामाला लागले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, धीरज धूपर, निया शर्मा आणि नीती टेलर यांची नावे या शोसाठी फायनल करण्यात आली आहेत. एवढेच नाही, तर आता एका ताज्या वृत्तानुसार, मेकर्स क्रिकेटर्सनाही शोमध्ये आणण्याचा प्लॅन करत आहेत.
युवराज सिंग शोमध्ये येणे जवळपास नश्चित -
ETimes च्या एका वृत्तानुसार, युवराज सिंग, सुरेश रैना, लसित मलिंगा आणि हरभजन सिंग यांच्यासारखे क्रिकेटर्स या शोमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच, मेकर्सनी या सर्व सेलेब्रिटी क्रिकेटर्ससोबत संपर्क साधला असून अद्याप त्यांचा होकार येणे बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युवराज सिंगने या शोसाठी डीलही साइन केली आहे. यामुळे तो शोमध्ये असणार हे निश्चित झाले आहे.
खरे तर हे चारही क्रिकेटर्स केवळ क्रिकेटमध्येच नाही, तर डान्समध्येही मास्टर आहेत. तसेच, या चारही खेळाडूंसोबत संपर्क साधण्यात आला असल्याचे चॅनलने स्वतःच सांगितले आहे. मात्र, डीलसंदर्भात अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. याशिवाय मेकर्स पुन्हा एकदा माधुरी दीक्षितला ज्यूरी म्हणून शोमध्ये आणत असल्याचेही समजते.