​'बढो बहू'मध्ये जया भट्टाचार्य दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 13:01 IST2018-05-04T07:31:21+5:302018-05-04T13:01:21+5:30

प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या कथेसह &TV आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच नवनवीन मालिका घेऊन येत असतात. बढो बहू ही अशीच एक ...

Jaya Bhattacharya appears in 'Badao Bahu' | ​'बढो बहू'मध्ये जया भट्टाचार्य दिसणार या भूमिकेत

​'बढो बहू'मध्ये जया भट्टाचार्य दिसणार या भूमिकेत

रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या कथेसह &TV आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच नवनवीन मालिका घेऊन येत असतात. बढो बहू ही अशीच एक रूढी परंपरा मोडीत काढणारी टेलिव्हिजन मालिका आहे. या मालिकेची वेगळी संकल्पना आणि त्याची वाढती प्रसिद्धी लक्षात घेऊन मालिकेच्या निर्मात्यांनी यातील नाट्य वाढविण्यासाठी नव्या पात्राला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून हे पात्र प्रसिद्ध अभिनेत्री जया भट्टाचार्य साकारणार आहे.
प्रसिद्ध दैनंदिन मालिकांमधील खाष्ट आणि दुष्ट व्यक्तिरेखा आजवर जया भट्टाचार्यने साकारल्या आहेत. या मालिकेच्या आगामी भागात कथेला अनुसरून एक महत्त्वाची भूमिका साकारून ती या मालिकेत एक वेगळे नाट्य घेऊन येणार आहे. सामाजिक कार्यकर्ती सुषमा बुवाची भूमिका ती साकारणार असून लाखाचे (प्रिन्स नरुला) तितलीशी (कनिका मान) लग्न लावण्याचा ती प्रयत्न करणार आहे. आपल्या प्रवेशाबद्दल जयाने सांगितले, “या मालिकेचा भाग होणार असल्यामुळे मी खूपच उत्साही आहे. या भूमिकेत मी हरयाणवी बोलणार आहे आणि या भाषेतील उच्चारण आणि तपशील जाणून घेताना माझी फारच तारांबळ उडतेय. बढो बहूच्या टीमबरोबर शूटिंग करणे म्हणजे खूपच छान वाटत असून ते सगळेच खूप मस्त आहेत. खरे तर आधीच प्रस्थापित झालेल्या मालिकेत साधारणतः जेव्हा नवे कलाकार येतात, तेव्हा सहसा त्यांना नीटसे सामावून घेतले जात नाही. पण इथे तसे काही झाले नाही. वाक्यांचे अर्थ न बदलता त्याभोवती विविध प्रयोग करून या पात्रामध्ये मी खूप काही विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहे. ही छोटीशी पण लक्षात राहण्याजोगी भूमिका लोकांना आवडेल अशी मला आशा आहे.”
जया भट्टाचार्य गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात अडकली असल्याचे तिनेच एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. जयाने मुलाखतीत सांगितले होते की, तिची आर्थिक परिस्थिती खालावली होती. पण या सगळ्यात हार मानायचे नाही असे तिने ठरवले होते. तिला कामाची नितांत गरज आहे असल्याचे देखील तिने म्हटले होते. काम मिळाल्यास या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडेल अशी खात्री देखील तिने व्यक्त केली होती. 
जयाला एका चांगल्या मालिकेत खूप चांगली भूमिका मिळाली असल्याने ती या सगळ्यातून बाहेर येईल असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 

Also Read : Bigg Boss 9 winner प्रिंस नरूलाने या अभिनेत्रीसह केला साखरपुडा

Web Title: Jaya Bhattacharya appears in 'Badao Bahu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.