घाईघाईत तशीच घराबाहेर पडली 'ही' अभिनेत्री,ड्रेसला प्राईज टॅग लावूनच संपूर्ण दिवस फिरली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 01:57 PM2021-02-20T13:57:03+5:302021-02-20T13:57:32+5:30

तिची प्रत्येक गोष्टीवर आता मीडियाची नजर आहे. त्यामुळे प्रत्येकदिवशी जास्मिन भसीन आता काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.

jasmin bhasin troll for price tag on her dress video viral | घाईघाईत तशीच घराबाहेर पडली 'ही' अभिनेत्री,ड्रेसला प्राईज टॅग लावूनच संपूर्ण दिवस फिरली

घाईघाईत तशीच घराबाहेर पडली 'ही' अभिनेत्री,ड्रेसला प्राईज टॅग लावूनच संपूर्ण दिवस फिरली

googlenewsNext

अनेकदा सेलिब्रेटी त्यांच्या कपड्यांमुळे ट्रोल होतात. हे अनेकदा पाहायला मिळते. कधी कधी कपड्यांमुळे त्यांच्यावर अवघडल्यासारखी परिस्थीतीही ओढावते. बिग बॉस १४ शोमध्ये जास्मिन भसीनने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. घरातून बाहेर पडल्यानंतर आता जास्मीनवर मीडियाच्या नजरा वळल्या आहेत. त्यामुळे ती जिथे जाते तिथे आता मीडियाही उपस्थित असते. तिची प्रत्येक गोष्टीवर आता मीडियाची नजर आहे. त्यामुळे प्रत्येकदिवशी जास्मिन भसीन आता काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.नुकतेच जास्मिनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजात जास्मिन पाहायला मिळत आहे. 


नेहमीप्रमाणे ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या लूकचे चाहते कौतक तर करत आहेत. मात्र आणखीन एका गोष्टीमुळे जास्मिनवर चर्चा रंगली आहे. जो ड्रेस जास्मिनने घातला त्याचा प्राइज टॅगच ती काढायला विसरली आणि तसाच ड्रेस तिने घातल्याचे पाहायला मिळत आहे. या एका गोष्टीवर चाहत्यांची नजर पडली आणि तिथेच तिच्यावर नेटीझन्सने निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. काही जण तिची खिल्लीही उडवत आहेत. जास्मिनला इतकी घाई लागली की, ती प्राइज टॅगच काढायला विसरल्याचे चाहते तिची मजा घेत आहेत.


'बिग बॉस १४' विजेता घोषित केल्यानंतर रसिकांमध्येही विजेता कोण होणार याकडेच अधिक लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. घरात स्पर्धक जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहे. रसिकांचे मनोरंजन करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे.प्रत्येकजण आपल्या मेहनत करतोय, असे असताना मात्र गायक राहुल वैद्यने रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगळाच फंडा वापरत असल्याच्या चर्चा घरातच सुरु झाल्या आहेत.

 

जास्मिन भसीनने सांगितले की, सोशल मीडियावर रुबीना आणि राहुल वैद्या दोघांची अधिक चर्चा पाहायला मिळते. इतकेच नाही तर पब्लिसिटीमध्ये राहण्यासाठी, सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये राहण्यासाठी राहुल वैद्य प्रत्येक आठवड्याला ५ लाख रुपये खर्च करत असल्याचे तिने म्हटले आहे.

Web Title: jasmin bhasin troll for price tag on her dress video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.