जमाई राजा फेम निया शर्माने बोल्डनेसमध्ये टाकले अलिया भट्ट, कतरिना कैफला मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 16:22 IST2016-12-13T16:22:16+5:302016-12-13T16:22:16+5:30

मागील दोन वर्षांपासून आशियातील सर्वांत सेक्सी महिलेचा ताज प्रियांकाच्या डोक्यावर होता. पण २०१६ या वर्षीचा सेक्सिएस्ट एशियन वूमनचा अॅवॉर्ड ...

Jamie King fame Nia Sharma dropped in boldness Alia Bhatt, behind Katrina Kaifa | जमाई राजा फेम निया शर्माने बोल्डनेसमध्ये टाकले अलिया भट्ट, कतरिना कैफला मागे

जमाई राजा फेम निया शर्माने बोल्डनेसमध्ये टाकले अलिया भट्ट, कतरिना कैफला मागे

गील दोन वर्षांपासून आशियातील सर्वांत सेक्सी महिलेचा ताज प्रियांकाच्या डोक्यावर होता. पण २०१६ या वर्षीचा सेक्सिएस्ट एशियन वूमनचा अॅवॉर्ड दीपिका पादुकोणने पटकावला आहे. ब्रिटेनच्या ‘इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी ‘एशियन सेक्सिएस्ट वूमन’साठी दीपिकाला सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रियांकाला दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे. पण या सर्वेक्षणात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. टीव्ही अभिनेत्रींनी यात जोरदार मुसंडी मारली असून ‘जमाई राजा’ या मालिकेत रोशनी खुरानाचे पात्र साकारलेली निया शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तिने कतरिना कैफ, आलिया भट्ट यांसारख्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. 
बॉलिवुडच्या अभिनेत्रींना शह टाकणारी ही निया शर्मा कोण आहे हे आपण जाणून घेऊया...

निया शर्माने काली-एक अग्निपरीक्षा या मालिकेद्वारे तिच्या छोट्या पडद्यावरील करियरला सुरुवात केली. त्यानंतर तिने बहने, एक हजारों में मेरी बहेना है या मालिकांमध्ये काम केले. या तिच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

Hot nia sharma

द प्लेयर या रिअॅलिटी शोमध्येदेखील निया झळकली होती. 

Third Sexiest Asian Woman Nia sharma

नियाने आतापर्यंत रोमँटिक, कॉमेडी अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकरल्या आहेत. एका मालिकेत कॅन्सर पीडित मुलीची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. या मालिकेसाठी तिने टक्कल केले होते. कोणत्याही मालिकेसाठी अभिनेत्रीने आपले मुंडन करण्याची छोट्या पडद्यावरची ही पहिलीच वेळ होती. 

Nia sharma in Bikni

जमाई राजा या मालिकेत नियाने दोन वर्षं काम केले होते. पण या मालिकेने लीप घेतल्यानंतर नियाला एका मुलाच्या आईची भूमिका साकारावी लागणार होती. त्यामुळे तिने या मालिकेला रामराम ठोकला.

Bold Nia sharma

 

निया मालिकेत भारतीय पेहरावात प्रेक्षकांना नेहमी पाहायला मिळत असली तरी ती तिच्या खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. वेस्टर्न कपड्यांमधील विविध फोटो ती नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिने काही दिवसांपूर्वी तिचा एक बिकनीमधील फोटो शेअर केला होता. या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती.



 नियाने एकदा तिचा बेडरूममधील झोपण्यापूर्वीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोची तर प्रचंड चर्चा झाली होती. 

Nia sharma in bed



Web Title: Jamie King fame Nia Sharma dropped in boldness Alia Bhatt, behind Katrina Kaifa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.