'जय मल्हार' फेम बानू उर्फ ईशा केसकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, तर BFनं केली ही कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 01:15 PM2023-03-31T13:15:06+5:302023-03-31T13:25:22+5:30

आधीची ईशा आणि आताची ईशा यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तिचं हे जबदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिचे चाहते थक्क झालेत.

Jai malhar fame isha keskar shared a transformation video viral | 'जय मल्हार' फेम बानू उर्फ ईशा केसकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, तर BFनं केली ही कमेंट

'जय मल्हार' फेम बानू उर्फ ईशा केसकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, तर BFनं केली ही कमेंट

googlenewsNext

झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या गाजलेल्या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात जाऊन पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर (Isha Keskar). 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमध्ये शनायाची मॉर्डन भूमिका तिने तितक्याच लिलया पेलली होती. काही दिवसांपूर्वीच ईशाचा ‘सरला एक कोटी’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. ईशा सोशल मीडियावर ही चांगली सक्रिय असते. ती नेहमीच तिचे विविध लूक्समधील फोटो शेअर करताना दिसते. सध्या ईशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यात तिने तिचा सिनेसृष्टीत येण्यापूर्वीचा फोटो शेअर केला आहे. आधीची ईशा आणि आताची ईशा यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. 

ईशाने यात तिचे काही वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. ईशामध्ये आता बराच बदल झालाय. तिनं आपलं वजन बऱ्यापैकी कमी झालंय. सुरुवातीला ती यात निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने ओढणी घेतली आहे. हातात पांढरी बॅग आहे. ही पोस्ट करत तिने लिहिलं, 'बदल घडणं गरजेचं आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचं हे जबदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिचे चाहते थक्क झालेत. ईशाच्या या व्हिडीओवर बॉयफ्रेंड 
 ऋषी सक्सेनानेही उफ्फ अशी कमेंट केलीय.  

२०१८ मध्ये, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईशासोबतचा फोटो पोस्ट करत ऋषीने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ईशा व ऋषी यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्याच भेटीत ऋषीच्या शांत स्वभावावर ईशा भाळली होती. अर्थात पहिल्या भेटीत काहीही बोलणं झालं नव्हतं. यानंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा व ऋषी यांचं बोलणं सुरू झालं आणि ईशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. पुढे मैत्री बहरली आणि एकदिवस ही मैत्री प्रेमाच्या कबुलीपर्यंत आली.

Web Title: Jai malhar fame isha keskar shared a transformation video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.