​बिग बॉस मराठीबाबत जय मल्हार फेम देवदत्त नागेने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 11:01 IST2018-04-13T05:27:54+5:302018-04-13T11:01:56+5:30

जय मल्हार या मालिकेमुळे देवदत्त नागेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने साकारलेली खंडोबाची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. ...

Jai Malhar Fame Devdatta Nagane revealed the big boss about Marathi | ​बिग बॉस मराठीबाबत जय मल्हार फेम देवदत्त नागेने केला खुलासा

​बिग बॉस मराठीबाबत जय मल्हार फेम देवदत्त नागेने केला खुलासा

मल्हार या मालिकेमुळे देवदत्त नागेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने साकारलेली खंडोबाची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. या मालिकेत काम करण्याआधी देवदत्तने देवयानी, बाजीराव मस्तानी, कालाय तस्मै नमः, महादेव यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. पण खंडोबा या व्यक्तिरेखेमुळे देवदत्तच्या करिय़रला एक वेगळे वळण मिळाले. त्याला या मालिकेमुळे इतकी लोकप्रियता मिळाली की, अनेकवेळा लोक त्यालाच खंडोबा समजून त्याच्या आजही पाया पडतात. या मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपली असली तरी आजही देवदत्तची लोकप्रियता प्रचंड आहे. ही मालिका दाक्षिणात्य भाषेतदेखील डब केली असल्याने तेथील लोक देखील आता देवदत्तचे फॅन्स झाले आहेत. आता छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर देवदत्त मोठ्या पडद्याकडे वळला आहे. त्याच्या दोन चित्रपटांचे सध्या चित्रीकरण सुरू असून वेलकम टू पट्टाया आणि चेंबूर नाका या दोन चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे चेंबूर नाका या चित्रपटाची निर्मिती देखील देवदत्तनेच केली आहे. या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तो खूपच उत्सुक आहे. 
देवदत्त गेली अनेक वर्षं मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे. देवदत्त जय मल्हार या मालिकेनंतर आता एका रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. बिग बॉस या कार्यक्रमाच्या यशानंतर बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या बिग बॉसच्या घरात आता मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज दिसणार आहेत. देवदत्त देखील बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा भाग असणार असल्याची चर्चा आहे. पण देवदत्त या कार्यक्रमाचा भाग नसणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. देवदत्त जय मल्हार या मालिकेनंतर मोठ्या पडद्याकडे वळला आहे. सध्या त्याच्या दोन चित्रपटांचे चित्रीकरण जोरात सुरू आहे. त्यामुळे तो त्याच्या याच चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
देवदत्त नागेला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असल्याने तो बिग बॉस मराठीचा भाग नसणार हे कळल्यानंतर त्याच्या फॅन्सची नक्कीच निराशा होणार आहे. 

Also Read : जय मल्हार फेम ​देवदत्त नागे बनला निर्माता

 

Web Title: Jai Malhar Fame Devdatta Nagane revealed the big boss about Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.