जे. डी. मजेठियांनी चाहत्यांना दिली‘खिचडी’ ट्रीट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 14:14 IST2018-03-27T08:44:16+5:302018-03-27T14:14:16+5:30

‘खिचडी’ ही विलक्षण लोकप्रिय मालिका नव्या स्वरूपात 14 एप्रिलपासून प्रसारित होणार असली,तरी तिच्या प्रोमोंमुळे ती आत्ताच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ...

J. D. Majithians gave fans 'favorite' treat! | जे. डी. मजेठियांनी चाहत्यांना दिली‘खिचडी’ ट्रीट!

जे. डी. मजेठियांनी चाहत्यांना दिली‘खिचडी’ ट्रीट!

िचडी’ ही विलक्षण लोकप्रिय मालिका नव्या स्वरूपात 14 एप्रिलपासून प्रसारित होणार असली,तरी तिच्या प्रोमोंमुळे ती आत्ताच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या शनिवारी ‘खिचडी’ मालिकेच्या प्रोमोचे वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने प्रसारण करण्यात आले. मालिकेचे निर्माते आणि अभिनेते जे. डी. मजिथिया यांनी मुंबईच्या काही भागांमध्ये सामान्य मुंबईकरांची भेट घेतली आणि त्यांना खिचडी खाऊ घातली.मजिठिया यांनी पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्थानकावर लोकल पकडली आणि ते बांद्रापर्यंत प्रवास केला.या प्रवासादरम्यान त्यांनी लोकलमधील प्रवाशांना खिचडी खायला देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.यावेळी त्यांनी प्रवाशांना खिचडी मालिकेच्या प्रोमोवर प्रतिक्रिया विचारली आणि त्यांना दाल खिचडी खाऊ घातली. यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या हिमांशू (स्वत: मजिथिया) या व्यक्तिरेखेशी संपर्क साधता आला आणि या मालिकेवरील प्रेम व्यक्त करता आले. यावेळी प्रवाशांनी त्यांना केवळ शुभेच्छाच दिल्या असे नव्हे, तर त्यांच्याबरोबर सेल्फीही काढल्या.या अनुभवामुळे उत्साहित झालेले मजिथिया म्हणाले, “लोकल ट्रेनमधून मी शेवटचा प्रवास केल्याला आता बरीच वर्षं उलटली असून या मालिकेमुळे मिळालेल्या प्रसिध्दी मिळाल्यानंतरही सामान्य लोकल प्रवाशांप्रमाणे लोकलमधून जाणं आणि लोकांशी संवाद साधणं यामुळे मी खूप आनंदित झालो.लोक मला अजूनही खिचडीतील हिमांशू म्हणून ओळखतात, हे पाहून मला खूपच आनंद झाला आणि लोकांमध्ये या मालिकेच्या पुन्हा प्रसारणाबद्दल उत्सुकता आहे, हे मला जाणवलं. यावेळी लोकांच्या प्रतिक्रियांमुळे मी विनम्र बनलो आणि यावेळी लोकांनी मला मालिकेच्या नव्या आवृत्तीसाठी खूप शुभेच्छा दिल्या.”

या नव्या सिझनमध्ये देखील या व्यक्तिरेखा कायम ठेवण्यात आल्या असून या मालिकेत अनंग देसाई, राजीव मेहता, सुप्रिया पाठक, वंदना पाठक, जे. डी. मजेठिया हे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.खिचडी या मालिकेत हंसा आणि प्रफुल्ल यांची मुलगी चक्की असल्याचे आणि जयश्रीचा मुलगा जॅकी असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. पारेख कुटुंबातील सगळ्यांचेच हे दोघेही लाडके असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले होते. जॅकी आणि चक्की दोघेही शाळेत जात असल्याचे आपल्याला मालिकेत पाहायला मिळाले होते.खिचडी या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असल्याने या मालिकेत काही वर्षांचा लीप दाखवला जाणार असून या मालिकेत चक्की आणि जॅकी मोठे झालेले दाखवणार असल्याचे म्हटले जात होते. पण जॅकी आणि चक्की यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना बालकलाकाराच पाहायला मिळणार असल्याचे या मालिकेचे निर्माते जे. डी. मजेठिया यांनीच सांगितले आहे. 

Web Title: J. D. Majithians gave fans 'favorite' treat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.