​‘झी टीव्ही’वरील ‘वो… अपना सा’मध्ये किंशुक वैद्य साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 16:26 IST2018-03-21T10:56:23+5:302018-03-21T16:26:23+5:30

‘झी टीव्ही’वरील ‘वो… अपना सा’ ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवत आहे. या ...

It's the role of realizing a few physicians in the 'Wo ... Apna saab' on Zee TV | ​‘झी टीव्ही’वरील ‘वो… अपना सा’मध्ये किंशुक वैद्य साकारणार ही भूमिका

​‘झी टीव्ही’वरील ‘वो… अपना सा’मध्ये किंशुक वैद्य साकारणार ही भूमिका

ी टीव्ही’वरील ‘वो… अपना सा’ ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावत आहेत. ‘वो… अपना सा’ या मालिकेत आतापर्यंत प्रेक्षकांनी पाहिले की, अर्जुन (सुदीप साहिर) आणि जिया (दिशा परमार) यांना दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न निशाने (मानसी साळवी) केला, तरी त्यांची प्रेमकथा बहरतच चालली आहे. हे कथानक सुरू असताना आता अर्जुनचा धाकटा भाऊ आकाश त्यांच्या जीवनात येणार आहे. आकाशची भूमिका छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता साकारणार आहे. या मालिकेत आता किंशुक वैद्यची एंट्री होणार आहे.
आकाश हा तरूण आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा असून तो मानसशास्त्रात ‘पीएच. डी.’ पदवीचा अभ्यास करत असतो. त्याचे आपला मोठा भाऊ अर्जुनवर अतिशय प्रेम असते आणि त्याच्या सुखासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची त्याची तयारी असते. आता आगामी भागांमध्ये दिसेल की, होळीनिमित्त बिन्नी (तान्या शर्मा) भांग पिते आणि तिची नशा चढल्यावर काही पुरुष तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पण हा प्रसंग हाताबाहेर जाण्याआधीच आकाश तिच्या मदतीला धावून येतो आणि तिची त्या माणसांपासून सुटका करतो. या मालिकेतील आपल्या प्रवेशावर किंशुक वैद्यने सांगितले, “आकाश हा स्मार्ट असून तो कुटुंब आणि नातेसंबंधांना महत्त्व देतो. तो मनाने दयाळू आणि भावनाप्रधान माणूस आहे आणि त्यामुळेच तो सर्वांचा लाडकाही असतो. एक अभिनेता म्हणून ‘वो… अपना सा’ या मालिकेत मला भूमिका रंगविण्यास मिळाल्याचा आनंद वाटतो; कारण मालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण कथानकामुळे तिने प्रेक्षकांमध्ये खळबळ माजविली आहे. माझ्या प्रवेशाबरोबरच कथानकाला नवे वळण लागणार असून माझी भूमिका प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा करतो.”
आपल्या कृतीने आकाश बिन्नीचे मन जिंकून घेईल काय? हा नव्या नात्याचा प्रारंभ तर नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना ‘वो… अपना सा’ या मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. 

Also Read : ​सुदीप साहिर पत्नी अनंतिकासह थायलंडमध्ये करतोय एन्जॉय

Web Title: It's the role of realizing a few physicians in the 'Wo ... Apna saab' on Zee TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.