इट्स मुव्ही टाईम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 12:29 IST2016-09-13T06:59:44+5:302016-09-13T12:29:44+5:30
मालिकेच्या चित्रीकरणातून कलाकारांना आपल्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना वेळ द्यायलाच मिळत नाही. पण चिडिया घर या मालिकेतील कलाकारांनी वेळात वेळ काढून ...
.jpg)
इट्स मुव्ही टाईम
म लिकेच्या चित्रीकरणातून कलाकारांना आपल्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना वेळ द्यायलाच मिळत नाही. पण चिडिया घर या मालिकेतील कलाकारांनी वेळात वेळ काढून फ्रिकी अली हा चित्रपट एकत्र पाहिला. या मालिकेत घोटकची भूमिका साकारणाऱ्या परेश गणंत्राने या चित्रपटात एक महत्तवाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या सगळ्यांनी मिळून या चित्रपटाचा आनंद घेतला. याविषयी आदिती साजवन सांगते, "मालिकेच्या संपूर्ण टीमने पहिल्यांदाच एकत्र चित्रपट पाहिला. आमच्यासोबत मालिकेचे निर्माते अश्वनी धीरदेखील आले होते. हा चित्रपट खूप चांगला असून नवाझुद्दीनने खूप चांगला अभिनय केला आहे. तसेच परेशचे कॉमिक टायमिंग खूपच चांगले जमले आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हा चित्रपट एन्जॉय केला. हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पार्टीदेखील केली."