नील सोडणार ये है मोहोब्बते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 17:08 IST2016-06-10T11:38:43+5:302016-06-10T17:08:43+5:30

ये है मोहोब्बते या मालिकेला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. या मालिकेच्या कथानकाला सध्या बरीच वळणे देण्यात आली आहेत. या ...

It is Mohilabate to leave Neil | नील सोडणार ये है मोहोब्बते

नील सोडणार ये है मोहोब्बते

है मोहोब्बते या मालिकेला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. या मालिकेच्या कथानकाला सध्या बरीच वळणे देण्यात आली आहेत. या मालिकेच्या कथानकासोबतच मालिकेच्या टीममध्येही काही बदल आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत पटनायक या वकिलाची भूमिका साकारणारा अभिनेता नील मोटवानी ही मालिका सोडणार आहे. या मालिकेत त्याच्या व्यक्तिरेखेला दिली जाणारी वळणे त्याला आवडली नसल्याने त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत अवदीप सिद्धू पटनायकची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: It is Mohilabate to leave Neil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.