यह उन दिनों की बात है फेम आशी सिंह वाट पाहात आहे त्या प्रेमपत्राची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 10:39 IST2018-03-22T05:09:25+5:302018-03-22T10:39:25+5:30

नव्वदीच्या दशकातील प्रेमप्रकरणे आणि आजच्या काळातील प्रेमप्रकरणे यात जमीन आस्मानचा फरक आहे. प्रेमीयुगलांना सतत एकमेकांच्या संपर्कात ठेवण्यासाठी त्यावेळी तंत्रज्ञान ...

It is a matter of those days that Fame Ash Singh waited for that love letter | यह उन दिनों की बात है फेम आशी सिंह वाट पाहात आहे त्या प्रेमपत्राची

यह उन दिनों की बात है फेम आशी सिंह वाट पाहात आहे त्या प्रेमपत्राची

्वदीच्या दशकातील प्रेमप्रकरणे आणि आजच्या काळातील प्रेमप्रकरणे यात जमीन आस्मानचा फरक आहे. प्रेमीयुगलांना सतत एकमेकांच्या संपर्कात ठेवण्यासाठी त्यावेळी तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते. सोशल मीडिया नव्हता आणि मोबाइल फोन्सचा शिरकाव देखील जीवनात झालेला नव्हता. त्यावेळी प्रेमीजन एकमेकांसोबत जो मिळेल तेवढा वेळ सुखात घालवत, फिरायला जात. नव्वदीच्या दशकातील रोमान्समधील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यावेळी प्रेमी एकमेकांना पत्रे लिहित असत. या पत्रांमधून त्यांच्या भावना आणि एकमेकांपासून दूर असल्याच्या व्यथा ते व्यक्त करत. अनेक वेळा तर ती पत्रं प्रिय व्यक्तीला मिळेपर्यंत अनेक दिवस निघून जात. 
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘यह उन दिनों की बात है’ या मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथानकात समीर आपल्या आजोबांच्या मृत्यूनंतर दिल्लीला आपल्या नातलगांकडे राहण्यासाठी गेला आहे आणि नयनाशी संपर्क ठेवण्याचा त्याच्याकडे एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे पत्र आणि टेलिफोन. नव्वदच्या दशकातील तरुणीची भूमिका साकारत असलेल्या आशी सिंहला ही प्रेमकथा साकारताना सुरुवातीला काही शंका होत्या. पण या मालिकेचा एक भाग झाल्यानंतर गतकाळातील प्रेम कथांबद्दलचे तिचे विचार बदलून गेले आहेत आणि मुख्य म्हणजे तिच्या भूमिकेचे कौतुक करणाऱ्या तिच्या चाहत्यांची अनेक पत्रे तिला येत आहेत. त्यामुळे आशीला अपेक्षा आहे की, ती जेव्हा प्रेमात पडेल तेव्हा तिच्या प्रियकराने देखील तिला प्रेमपत्र लिहून पाठवावे. याविषयी आशी सिंह सांगते, “मी खऱ्या आयुष्यात नयनापेक्षा खूप वेगळी आहे. सुरुवातीला नव्वदच्या दशातील प्रेमाची संकल्पना मला खोटी वाटायची. पण प्रेक्षकांना ही संकल्पना आता आवडू लागली आहे. तसेच त्यांना आमचा अभिनय देखील आवडत आहे. माझी भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे हे सांगण्यासाठी मला माझे चाहते अनेक पत्रं पाठवत आहेत आणि मी ती सर्व पत्रे मी जपून ठेवली आहेत. काहींनी तर या मालिकेतील माझ्या लुकचे चित्र देखील काढून पाठवले आहे. सध्याच्या कथानकात समीर दिल्लीला जातो आणि एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी त्या दोघांकडे टेलिफोन आणि पत्र हे दोनच मार्ग आहेत. हाताने लिहिलेली पत्रं फार छान असतात कारण त्यातून समोरच्या व्यक्तीचे विचार आणि भावना व्यक्त होतात. मला खरोखर असे वाटू लागले आहे की, भविष्यात माझ्या जोडीदाराने देखील माझ्यासाठी एखादे तरी प्रेम पत्र लिहावे. 

Also Read : यह उन दिनो की बात है फेम आशी सिंह पडली पद्मिनी कोल्हापुरेच्या लूकच्या प्रेमात

Web Title: It is a matter of those days that Fame Ash Singh waited for that love letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.