इरफान खान छोट्या पडद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 01:54 IST2016-06-26T01:54:59+5:302016-06-26T01:54:59+5:30
इरफान खानने छोट्या पडद्यावरूनच त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. बनेगी अपनी बात या मालिकेत इरफानने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

इरफान खान छोट्या पडद्यावर
इरफान खानने छोट्या पडद्यावरूनच त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. बनेगी अपनी बात या मालिकेत इरफानने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आता इतक्या वर्षांनंतर इरफान छोट्या पडद्यावर परतणार आहे. इरफानचा मदारी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इरफान छोट्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन चिडिया घर या मालिकेत तो करणार असून या भागासाठी त्याने नुकतेच चित्रीकरण केले. देव हा मदारी असून आपल्याला सगळ्यांना तो त्याच्या तालावर नाचवतो ही शिकवण चिडिया घरमधील सदस्यांना इरफान देणार आहे.