‘कालभैरव रहस्य’मध्ये इक्बाल खान प्रमुख भूमिकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 14:58 IST2017-10-16T09:28:30+5:302017-10-16T14:58:30+5:30

अभिनेता  इक्बाल खान हा ‘कालभैरव- रहस्य’ या आगामी मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत तो इंद्रदेवाची भूमिका ...

Iqbal Khan plays a key role in 'Kalbhairav ​​Mystery'! | ‘कालभैरव रहस्य’मध्ये इक्बाल खान प्रमुख भूमिकेत!

‘कालभैरव रहस्य’मध्ये इक्बाल खान प्रमुख भूमिकेत!

िनेता  इक्बाल खान हा ‘कालभैरव- रहस्य’ या आगामी मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत तो इंद्रदेवाची भूमिका साकारणार असून या छोटेखानी परंतु महत्त्वाच्या भूमिकेत तो आपल्या दर्जेदार अभिनयगुणांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.या मालिकेत तो एका पाहुण्या कलाकाराची भूमिकेत झळकणार आहे. याविषयी इक्बालने सांगितले की, “या मालिकेचा दिग्दर्शक धर्मेश शहा हा माझा जवळचा मित्र असून माझ्या मते तो या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहे. मी त्याला नकार देऊ शकत नसल्याने मी ही भूमिका स्वीकारली. माझी जरी एका पाहुण्या कलाकाराची भूमिका असली, तरी या मालिकेचं कथानक इतकं गुंतागुंतीचं आहे की पहिल्या दृष्यापासून प्रेक्षक तिला खिळून राहतील.” तो पुढे म्हणाला, “अभिनयाच्या क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबर चित्रीकरण करताना मला मजा आली. मालिकेच्या प्रारंभीच्या काही भागांचं चित्रीकरण आम्ही महेश्वर येथील शंकराच्या सुमारे 400 वर्षं जुन्या मंदिरात केलं. तिथलं वातावरण फारच अद्भुत होतं. यापूर्वी मी छायाचित्रणप्रमुख वीरू आणि धर्मेश यांच्याबरोबर काम केलं असून यावेळचा अनुभवही तितकाच उत्तम होता. या मालिकेच्या सार्‍या टीमला माझ्या शुभेच्छा. भावनात्मक आणि भव्यतेबाबत धर्मेश शहा सहसा चुकीचा ठरत नाही, याची मला खात्री आहे.”त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेन असा विश्वास असल्याचे त्याने सांगितले.

'एक था राजा एक थी राणी' या मालिकेतही इक्बाल खान झळकला होता.इक्बाल खान आणि दीपशिखा नागपाल मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या दोघांच्या एंट्रीमुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळाले होते.  या मालिकेनंतर 'कालभैरव रहस्य' मालिकेच्या निमित्ताने तो छोट्या पडद्यावर झळकणार आहे.या मालिकेसाठी इक्बालही खूप उत्सुक आहे.इक्बालने 'कैसा ये प्यार है','कहीं तो होगा','काव्यांजलि','करम अपना अपना','छूना है आसमान','वारिस' यासारख्या मालिकेत विविधारंगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच तो लवकरच एका मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे कळतंय.तुर्तास याविषयी इक्बालने काही न बोलणेच पसंत केले आहे. 

Web Title: Iqbal Khan plays a key role in 'Kalbhairav ​​Mystery'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.