​गुजराती चित्रपटासाठी भाव्या गांधीने सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 13:28 IST2017-02-27T07:58:28+5:302017-02-27T13:28:28+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पूची व्यक्तिरेखा साकारणारा भाव्या गांधी हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. या मालिकेतील ...

Inverted glasses of Tarak Mehta left for Bharatiya Gandhi for Gujarati film | ​गुजराती चित्रपटासाठी भाव्या गांधीने सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा

​गुजराती चित्रपटासाठी भाव्या गांधीने सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा

ref="http://cnxmasti.lokmat.com/television/news/taarak-mehta-ka-ooltah-chashmah-will-give-swachh-bharat-abhiyan-message/17991">तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पूची व्यक्तिरेखा साकारणारा भाव्या गांधी हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. या मालिकेतील त्याचा अभिनय, त्याची केस उडवण्याची स्टाइल सगळे काही प्रेक्षकांना खूपच आवडते. ही मालिका सुरू झाल्यापासूनच तो या मालिकेचा भाग आहे. गेली आठ वर्षं तो या मालिकेत काम करत आहे. पण आता भाव्याने या मालिकेला रामराम ठोकला आहे. भाव्याने जानेवारीत ही मालिका सोडली असून टप्पूची भूमिका कोण साकारणार यासाठी सध्या शोधाशोध सुरू आहे.
भाव्या गांधीला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने खरी लोकप्रियता मिळवून दिली. आज प्रेक्षक त्याला टप्पू म्हणूनच ओळखतात. पण असे असले तरी भाव्याने एक गुजराती चित्रपट करण्यासाठी ही मालिका सोडली आहे. एका गुजराती चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत झळकणार असून या चित्रपटात मनोज जोशी, केतकी दवे आणि जॉनी लिव्हर यात्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
भाव्याला आतापर्यंत प्रेक्षकांनी बालकलाकाराच्या भूमिकेत पाहिले आहे. पण आता भाव्या नायक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणालादेखील त्याने सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी भाव्या सांगतो, "जानेवारीत मी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडली हे खरे आहे. आठ वर्षं आणि आठ महिन्याचा हा प्रवास खूपच चांगला होता. या मालिकेतील टीमसोबत काम करायला मला खूपच मजा आली. असित मोदी सरांनी मला दिलेल्या या संधीसाठी मी त्यांचा आभारी आहे. मला आतापर्यंत माझ्या फॅन्सने ज्याप्रकारे पाठिंबा दिला आहे, तसाच भविष्यातही द्यावा आणि भविष्यातही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करावा असे मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे." 

Web Title: Inverted glasses of Tarak Mehta left for Bharatiya Gandhi for Gujarati film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.