Intresting: ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये दिसणार छोट्या राणाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 16:53 IST2017-05-31T11:22:19+5:302017-05-31T16:53:37+5:30

‘चालतंय की’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पहिलवान गडी राणादा सध्या खूपच ...

Intresting: The story of the little Rana that will appear in 'Jivada Rangala' | Intresting: ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये दिसणार छोट्या राणाची गोष्ट

Intresting: ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये दिसणार छोट्या राणाची गोष्ट

ालतंय की’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पहिलवान गडी राणादा सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे.  राणा या भूमिकेच्या माध्यमातून हार्दिक आज घराघरांत पोहचला आहे.अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या राणाने वेड लावलंय. शरीराने जरी दांडगा पहिलवान असला तरी मनाने अतिशय साधा सरळ असलेल्या राणाच्या या स्वभावामुळेच अंजलीही त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांचं लग्नही झालं. राणाचे सर्व गुण चांगले असले तरी त्याचं शिक्षणापासून दूर पळणं, पुस्तकांना घाबरणं या गोष्टी अंजलीला आवडत नाहीत. लग्नानंतर अंजलीची वाचनाची आवड जपण्यासाठी राणा स्वतःहून तिला पुस्तके आणून देतो परंतु स्वतः मात्र त्यापासून दुर पळतो. अंजलीसुद्धा राणाला शिकविण्याचा चंग बांधते आणि त्या दिशेने प्रयत्न करायला लागते. परंतु त्यात तिला अपयशच मिळतं. त्यावेळी गोदाक्का तिला राणाच्या या भितीमागचं कारण सांगणार आहेत आणि यातूनच राणाचा बालपणीचा प्रवास उलगडणार आहे. यामाध्यमातून रसिकांना राणाच्या बालपणीची गोष्ट पाहायला मिळणार आहे.मालिकेच्या आगामी भागाता छोट्या राणाची एंट्री होणार आहे.राणाला अभ्यासाची भिती का वाटते ? तो मुलींशी बोलायला का घाबरतो? त्याला कुस्तीचा छंद कसा जडला? बरकतची आणि त्याची मैत्री कशी झाली ? या सगळ्या गोष्टींची उत्तरे येत्या काही भागांमधून बघायला मिळणार आहेत. रुद्र रेवणकर या बालकलाकाराने हा छोटा राणा साकारला आहे. त्यामुळे बालपणीच्या या राणाची धम्माल मस्ती बघणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Intresting: The story of the little Rana that will appear in 'Jivada Rangala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.