साबु सिरिल डिजाईन करणार इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सचा सेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 09:39 IST2017-12-27T04:09:05+5:302017-12-27T09:39:05+5:30

बाहुबली आणि बाहुबलीः दि कन्क्लूजन ह्या दोन भव्य चित्रपटांचे सेट बनवलेल्या साबु सिरिल यांना स्टार प्लसवरील आगामी टॅलेन्ट रिअॅलिटी ...

India's Next Superstars set to design Saboo Cyril | साबु सिरिल डिजाईन करणार इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सचा सेट

साबु सिरिल डिजाईन करणार इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सचा सेट

हुबली आणि बाहुबलीः दि कन्क्लूजन ह्या दोन भव्य चित्रपटांचे सेट बनवलेल्या साबु सिरिल यांना स्टार प्लसवरील आगामी टॅलेन्ट रिअॅलिटी शो इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सचा सेट बनवण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

साबु ह्या इंडस्ट्रीचा २ दशकांपासून हिस्सा राहिलेले असून त्यांनी हेराफेरी, मैं हूँ ना, भूल भूलैय्या इत्यादी चित्रपटांसाठी काम केले आहे. आता टेलिव्हिजन शोसाठी ते प्रथमच सेट डिजाईन करणार आहेत.  सूत्रांनुसार, साबु यांनी बिग स्क्रीनवर काही उत्तम सेट्‌स बनवले आहेत. त्यांच्यासोबत हा शो आणखीनच छान बनेल. ह्या शोमध्ये करण जोहर आणि रोहित शेट्टी स्पर्धकांना इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सचे विजेता बनण्यासाठी मार्गदर्शन करतील.


करण आणि रोहित पुढील काळात सिंबा या चित्रपटाची मिळून निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. रणवीरने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. करण जोहर आणि रोहितच्या या चित्रपटातील मुख्य कलाकाराची निवड तर झाली आहे. आता ते आणखी काही महत्त्वाच्या भूमिकेसाठी या कार्यक्रमाद्वारे कलाकार शोधत असल्याची चर्चा आहे. करण किंग ऑफ ड्रामा म्हणून तर रोहित किंग ऑफ अॅक्शन म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते दोघे एकत्र आल्यानंतर प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार यात काहीच शंका नाही. या कार्यक्रमाबद्दल करण जोहर सांगतो, एखाद्या सिनेमातील हिरोप्रमाणे मिळणारे प्रेम आणि त्याच्यासाठी असलेला वेडेपणा खरोखरच अद्‌भुत असतो. त्यामुळे सिनेमांचा हिस्सा बनणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यातही सिनेमामुळे तुम्ही जगभरात पोहचतात त्यामुळे हे सगळे अनुभवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण अहोरात्र मेहनत करत असतो. त्यामुळे  इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स हा एक असा शो आहे जिथे भावी अभिनेत्यांना त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी देणार आहे. त्यांच्या स्वप्नांना योग्य तो मार्ग दाखवण्याचे काम हा शो करत आला आहे. रोहित शेट्टीसोबत स्टार प्लससारख्या मंचावर उद्याचा सुपरस्टार शोधण्याच्या ह्या प्रवासावर निघताना मी खूप उत्सुक आहे.

Web Title: India's Next Superstars set to design Saboo Cyril

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.