‘इंडियन आयडल 12’मध्ये बहरतेय नवी लव्ह स्टोरी! सायली कांबळे म्हणाली, माझे त्याच्यावर प्रेम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 03:45 PM2021-05-30T15:45:39+5:302021-05-30T15:46:03+5:30

Indian Idol 12: आधी शोमध्ये अरूणीता व पवनदीप यांचा लव्ह अँगल दाखवला गेला. आता काय तर सायली कांबळे हिची सेटवर बहणारी स्टोरी बाहेर आलीये.

Indian Idol 12: Sayli Kamble confesses her love for Nihal Tauro | ‘इंडियन आयडल 12’मध्ये बहरतेय नवी लव्ह स्टोरी! सायली कांबळे म्हणाली, माझे त्याच्यावर प्रेम!!

‘इंडियन आयडल 12’मध्ये बहरतेय नवी लव्ह स्टोरी! सायली कांबळे म्हणाली, माझे त्याच्यावर प्रेम!!

googlenewsNext
ठळक मुद्देइंडियन आयडलचा हा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

इंडियन आयडल 12 (Indian Idol 12)सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. कधी वाद तर कधी प्रेम... होय, गेल्या काही दिवसांपासून हा शो वादांमुळे चर्चेत होता. आताश: शोमधील कंटेस्टंटच्या लव्ह अँगलमुळे हा शो चर्चेत आहे. होय, टीआरपीसाठी ग्लॅमर आणि लव्ह स्टोरीचा तडका देण्याचे काम सध्या या शोमध्ये सुरू आहे. यासाठीच आधी शोमध्ये अरूणीता व पवनदीप यांचा लव्ह अँगल दाखवला गेला. आता काय तर सायली कांबळे (Sayli Kamble ) हिची सेटवर बहणारी स्टोरी बाहेर आलीये. (Sayli Kamble confesses her love for Nihal Tauro)
  मराठमोळी गायिका सायली कांबळे शोच्याच एका कंटेस्टंटच्या प्रेमात पडल्याचे दाखवलं जातेय. हा स्पर्धक कोण तर निहाल तारो (Nihal Tauro).



सोनी वाहिनीने इंडियन आयडलच्या नव्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निहाल किशोर कुमार यांचे ‘दिल क्या करे’ हे गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या सादरीकरणानंतर होस्ट आदित्य नारायण असे काही बोलतो की, सगळेच हैराण होतात.  निहाल गात होता तेव्हा सयाली देखील संपूर्ण गाणं गुणगुणत होती, असे आदित्य म्हणतो. यावर, आम्ही दोघेही टॉम आणि जेरीसारखे आहोत आणि माझे त्याच्यावर प्रेम आहे, असे सायली म्हणते. यानंतर निहाल म्हणतो की, सायली नेहमीच त्याची गाण्यात मदत करते. यावर सायली म्हणते की, हा भाग जरी गर्ल्स वर्सेस बॉईजचा असला, तरी निहालचे चांगलंच गाणार याची़ मला खात्री होती.   

इंडियन आयडलचा हा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही जणांनी प्रेम व्यक्त केल्या बद्दल सायली कांबळेचे कौतुक केले आहे. तर काहींनी मात्र टीका केली आहे. हा केवळ इंडियन आयडलचा पब्लिसीटी स्टंट आहे. यापूर्वी देखील त्यांनी अशी खोटी प्रेम प्रकरणं उभी केली होती अशी टीका केली जात आहे. आता सायलीचे हे प्रेम प्रकरण खरं आहे की खोटं हे येत्या भागात सिद्ध होईल. शिवाय सायलीची ही प्रेमाची कबुली शोला किती टीआरपी मिळवून देईल, तेही दिसेन.

Web Title: Indian Idol 12: Sayli Kamble confesses her love for Nihal Tauro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.