Indian Idol 12 : लंडनच्या रस्त्यावर पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलाल दिसले रोमँटिक मूडमध्ये, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 17:57 IST2021-10-29T17:57:07+5:302021-10-29T17:57:29+5:30
Indian Idol 12 फेम पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलाल सध्या लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Indian Idol 12 : लंडनच्या रस्त्यावर पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलाल दिसले रोमँटिक मूडमध्ये, फोटो झाले व्हायरल
छोट्या पडद्यावरील सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२मधील पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नुकतेच दोघांचा मंजूर दिल हा म्युझिक अल्बम रिलीज झाला आहे. या गाण्याला चाहत्यांची पसंती मिळते आहे. ते दोघे लंडनमध्ये क्वॉलिटी टाइम स्पेंड करत आहेत. तिथले त्यांचे काही फोटो समोर आले आहेत, यात ते दोघे रोमँटिक मूडमध्ये पहायला मिळाले.
अरुणिता कांजीलालने इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने अॅडव्हेंचरला सुरूवात झाली असे कॅप्शन लिहिले आहे. त्याचसोबत या दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. त्याच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत. त्याच्या एका चाहत्याने 'पवनू एआरयू स्पेशल अमेजिंग जोडी' असे लिहिले आहे, तर दुसऱ्याने 'खूप छान फोटो' असे लिहिले आहे.
पवनदीप राजन इंडियन आयडॉल १२ चा विजेता ठरला आणि अरुणिता कांजीलाल उपविजेती ठरली. या शोमध्ये पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलाल या जोडीचा रोमँटिक अँगलही पहायला मिळाला. ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप हिट आहे. या जोडीच्या अफेयर्सच्या चर्चा रंगल्यानंतर त्या दोघांनी कायम एकत्र यावे, असे त्यांच्या चाहत्यांना वाटते.