Indian Idol 12 : स्क्रिप्टेड आहे का इंडियन आयडॉल शो ?, स्पर्धक आशिष कुलकर्णीनं केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:07 IST2021-07-08T14:06:39+5:302021-07-08T14:07:11+5:30
इंडियन आयडॉल १२ शो सातत्याने लोकांच्या निशाण्यावर आहे. बऱ्याचदा शो स्क्रिप्टेड असल्याचे म्हटले जाते. आता याचा खुलासा या शोचा स्पर्धक आशिष कुलकर्णीने केला आहे.

Indian Idol 12 : स्क्रिप्टेड आहे का इंडियन आयडॉल शो ?, स्पर्धक आशिष कुलकर्णीनं केला पर्दाफाश
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग शो इंडियन आयडॉल १२ गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. कधी गेस्ट, तर कधी कंटेस्टंट्सच्या परफॉर्मन्समुळे शो खूप चर्चेत येत असतो. कंटेस्टंट आशिष कुलकर्णी या सीझनमधील टॉप ७ स्पर्धकांपैकी एक आहे. कोरोनामुळे शोचे शूटिंग बायो बबलमध्ये होते आहे ज्यामुळे स्पर्धक आपल्या कुटुंबाला ६ महिन्यांपासून भेटू शकले नाही. आता नुकतेच टॉप स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबाकडे, त्यांच्या शहरात पाठवले. त्यावेळी त्यांची त्यांच्या जवळच्या लोकांसोबत भेटीगाठी झाल्या.
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, आशिष कुलकर्णीने कुटुंबासोबत भेटल्यानंतर मीडियासोबत बातचीत केली आणि शोमधील आतापर्यंतचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्याला हा शो स्क्रिप्टेड आहे का हा प्रश्न विचारल्यावर त्याने सांगितले की, शोचा कोणताच परफॉर्मन्स स्क्रिप्टेड नाही. जर कुणाचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर निगेटिव्ह कमेंट्सचा ऐकायला मिळतात.
आशिष पुढे म्हणाला, मी तुम्हाला सर्वांना सांगतो की हा शो नॅचरल आणि ऑर्गेनिक आहे. जसे आम्ही परफॉर्म करतो. तसेच तुम्हाला सगळे दाखवले जाते. त्यात काहीच बदल केले जात नाही. जर तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे तर तुम्हाला प्रशंसाच ऐकायला मिळते. जर तुम्ही चांगले गात नसाल तर तुम्हाला ओरडा पडतो. बाकीच्या गोष्टी होतात ते सर्व एण्टरटेन्मेंटचा भाग आहे. आमच्या सर्वांचा आमचा प्रवास आहे आणि हे स्क्रिप्टेड अजिबात नाही हेच सत्य आहे.
इंडियन आयडॉल १२ या शो सुरूवातीपासून चर्चेत राहिला आहे. आता हा शो अंतिम टप्प्यात पोहचला असून या शोमध्ये कोणता स्पर्धक बाजी मारणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.