Indian Idol 12 : 'मी प्रेमात आहे..!', अखेर पवनदीपने दिली प्रेमाची कबुली, अरूणिमा दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 12:51 PM2021-06-29T12:51:27+5:302021-06-29T12:54:50+5:30

इंडियन आयडॉल १२च्या आगामी भागाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Indian Idol 12: 'I am in love ..!', Finally Pawandeep confessed his love, Arunima gave this reaction | Indian Idol 12 : 'मी प्रेमात आहे..!', अखेर पवनदीपने दिली प्रेमाची कबुली, अरूणिमा दिली ही रिअ‍ॅक्शन

Indian Idol 12 : 'मी प्रेमात आहे..!', अखेर पवनदीपने दिली प्रेमाची कबुली, अरूणिमा दिली ही रिअ‍ॅक्शन

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो इंडियन आयडॉलचा १२वा सीझन सातत्याने चर्चेत येतो आहे. हा शो सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतो आहे. या शोला चारचाँद लावण्यासाठी वेगवेगळे कलाकार हजेरी लावताना दिसतात. या आठवड्यात बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा दिसणार आहेत. यावेळी सर्व स्पर्धक शत्रुघ्न सिन्हाच्या चित्रपटातील गाण्यावर महफिल सजवाताना दिसणार आहे. तसेच त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल गोष्टी शेअर करताना दिसणार आहे. मात्र या भागात पवनदीप आपले प्रेम व्यक्त करताना दिसला. हा खूप स्पेशल एपिसोड ठरणार आहे.

इंडियन आयडॉल १२च्या आगामी भागाचा एक व्हिडीओ अरूणिताच्या फॅन क्लबवर शेअर केले आहे. या व्हिडीओत पहायला मिळते आहे की, सर्वात आधी शत्रुघ्न सिन्हा पत्नी पूनम सिन्हासोबत शोमध्ये एन्ट्री करत आहे. त्यानंतर अरूणिता आपल्या गाण्यांनी सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.तिच्या गाण्याची व आवाजाचे सर्वांनी कौतुक केले. अनु मलिकने अरूणिताला म्हटले की, तू पकोडे बनव आणि हिमेशजी खातील. मग काय स्टेजवर मिनी किचन सजविले गेले आणि अरूणिता पकोडे बनवू लागली. त्यानंतर तिने हिमेश, अनु आणि सोनू कक्कर यांना पकोडे खावू घातले.


या व्हिडीओत पहायला मिळते आहे की, शोचा होस्ट आदित्य नारायण स्पर्धक पवनदीपला स्वतःच्या हाताने पकोडा खाऊ घालत आहे आणि म्हणत आहे की जसा मी पवनदीपला स्वतःच्या हाताने खाऊ घालत आहे तसे अरूणिमा प्रार्थना कर कोणती तरी सुंदर मुलगी स्वतःच्या हाताने खाऊ घालेल. त्यानंतर पवनदीप म्हणाला की, हा पावसाचा ऋतू जेव्हा येतो तेव्हा नवीन काहीतरी घेऊन येतो. मला वाटते की मी प्रेमात आहे. त्यानंतर सर्व स्पर्धकांसोबत परीक्षकांची रिएक्शन पाहण्यासारखी होती.

Web Title: Indian Idol 12: 'I am in love ..!', Finally Pawandeep confessed his love, Arunima gave this reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.