'दिल दियां गल्लां' उत्कंठावर्धक वळणावर, रियाने आजोबा दिलप्रीत यांच्यासोबत नाते तोडण्याचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 19:03 IST2023-05-03T19:02:12+5:302023-05-03T19:03:01+5:30
दिल दियां गल्लांमध्ये गैरसमजुतीने उद्भवलेली परिस्थिति, भावनिक गोंधळ आणि खोलवर रुजलेले समज यामुळे विखुरलेल्या कुटुंबाचे चित्रण आहे.

'दिल दियां गल्लां' उत्कंठावर्धक वळणावर, रियाने आजोबा दिलप्रीत यांच्यासोबत नाते तोडण्याचा घेतला निर्णय
सोनी सबवरील ‘दिल दियां गल्लां’मध्ये गैरसमजुतीने उद्भवलेली परिस्थिति, भावनिक गोंधळ आणि खोलवर रुजलेले समज यामुळे विखुरलेल्या कुटुंबाचे चित्रण आहे. आगामी भागांमध्ये, कथानक एका विशिष्ट मार्मिक अध्यायापर्यंत पोहोचते, ज्यामध्ये रिया (हेमा सूद), वीर (पारस अरोरा) याच्याशी नाते संपवते तसेच ज्यांच्या ती अतिशय जवळची असते त्या तिच्या दिलप्रीत (पंकज बेरी) आजोबांशी देखील संबंध तोडते. पुढील भागांमध्ये, सुधारणेच्या पलीकडे ताणल्या गेलेल्या कौटुंबिक बंधांचे परिणाम खचितच हृदय विदारक असतील.
दिलप्रीतने अमृताला दिलेल्या अढळ पाठिंब्यामुळे रियाचे मन दुखावले आहे आणि ही बोच तिच्या मनात खदखदत असलेली सोनी सब वरील ‘दिल दियां गल्लां’मध्ये महिन्यांपासून दिसत आहे. तिला असे नेहमीच वाटते की तिच्याऐवजी दिलप्रीतने अमृताची निवड केली आणि अलीकडच्या काळात ब्रार कुटुंबाने ज्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड दिले आहे त्यावरून ही भावना दृढ झाली आहे. तरीही, जेव्हा डॉलरने अमृताचे अपहरण होते आणि दिलप्रीत अमृताला वाचवण्यासाठी धावतो, तेव्हा अमृताला शारीरिक दुखापत झालेली असूनही रियाचे मन दुखावते. हा विश्वासघात रियाला सहन होऊ शकणारा नाही. ती तिच्या आजोबांशी संबंध तोडण्याचा निर्णय घेते. या निर्णयाने ब्रार कुटुंबाला धक्का बसतो आणि यानंतर मालिकेला खात्रीने कायमस्वरूपी कलाटणी मिळणार आहे.
रियाची भूमिका साकारणारी हेमा सूद म्हणते, “एक कलाकार म्हणून ‘दिल दियां गल्लां’च्या सध्याच्या कथानकात रियाच्या भावना चित्रित करण्याचा अनुभव समृद्ध करणारा आहे. अमृताला संकटाच्या वेळी वाचवण्याच्या दिलप्रीतच्या निर्णयामुळे रियाच्या व्यक्तिरेखेच्या असुरक्षितेला एक नवीन आयाम मिळाला आहे. प्रत्येक दृश्यात तिच्या मनातील प्रेम, विश्वासघात आणि दुखावल्याच्या परस्परविरोधी भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आव्हानात्मक आहे. परंतु, मी या गुंतागुंतीच्या भावना आत्मसात करून पडद्यावरील माझ्या व्यक्तिरेखेचे नानाविध पैलू सादर करण्याच्या संधीचा आनंद लुटत आहे.”