'अप्पी आमची कलेक्टर' उत्कंठावर्धक वळणावर, काय होईल जेव्हा अर्जुन अप्पीला दंगलीला सामोरं जाताना बघेल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 03:24 PM2024-01-12T15:24:57+5:302024-01-12T15:25:24+5:30

'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे.

In 'Appi Amchi Collector' exciting twist, what will happen when Arjun sees Appi facing a riot? | 'अप्पी आमची कलेक्टर' उत्कंठावर्धक वळणावर, काय होईल जेव्हा अर्जुन अप्पीला दंगलीला सामोरं जाताना बघेल ?

'अप्पी आमची कलेक्टर' उत्कंठावर्धक वळणावर, काय होईल जेव्हा अर्जुन अप्पीला दंगलीला सामोरं जाताना बघेल ?

 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. या मालिकेत  अप्पी आणि अर्जुन आपल्या येणाऱ्या बाळासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान साताऱ्यात दंगल सुरू होते. अर्जुन पोलिसाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी जातो. मात्र तो अप्पीला घरीच थांबायला सांगतो. मात्र अप्पी दंगल थांबवण्यासाठी जाण्याचा निर्णय घेते. 

अप्पी आणि अर्जुनच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. त्याचे पाऊल या जगात पडायच्या आधीच त्याच आयुष्य आनंदमयी करायची तयारी चालू आहे. हे सगळं होत असताना अर्जुनला बातमी मिळते ती साताऱ्यात दंगल सुरु झाल्याची आणि त्या दंगलीत अप्पीचा भाऊ दिप्या अडकला आहे. एका पोलीसाच कर्तव्य पार पाडण्यासाठी अर्जुन रात्रीच कामाला जायला निघतो. पण अर्जुनला अप्पीची चिंता सतावते म्हणून तो तिला या परिस्थितीत घरीच थांबायला सांगतो. 

अप्पीला दिप्याबद्दल समजते. त्याचवेळी  सुषमा येते आणि  अप्पीला सांगते की गेल्या वेळी कलेक्टरने काम केले नाही, म्हणून मी माझा मुलगा गमावला, यावेळी दुसऱ्या मुलाला काही झाले नाही पाहिजे. एक कलेक्टर असून एवढ्या गंभीर परिस्तिथीत ती हातावर हाथ घेऊन घरी बसणे तिला पटत नाही. अप्पी, अर्जुन आणि घरातल्यांच्या विरोधात जाऊन दंगलीत जायचा निश्चय करते. काय होईल जेव्हा अर्जुन अप्पीला दंगलीला सामोरे जाताना बघेल? ही कुठच्या येणाऱ्या मोठ्या वादळाची चाहूल तर नसेल? त्यासाठी 'अप्पी आमची कलेक्टर' मालिका पाहावी लागेल.

Web Title: In 'Appi Amchi Collector' exciting twist, what will happen when Arjun sees Appi facing a riot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.