'लोकांच्या शिव्या ऐकल्या की मला आनंद होतो'; 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 08:13 PM2021-12-10T20:13:52+5:302021-12-10T20:14:19+5:30

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरुद्धचा प्रेक्षक खूप तिरस्कार करतात.

'I'm glad to hear people swearing'; Discussion of actor's post in 'Aai Kuthe Kay Karte' | 'लोकांच्या शिव्या ऐकल्या की मला आनंद होतो'; 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

'लोकांच्या शिव्या ऐकल्या की मला आनंद होतो'; 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अनिरुद्धची भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या निशाण्यावर येते. चांगला संसार असताना पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन संजनासोबत दुसऱ्यांदा लग्न केले. त्यामुळे त्या भूमिकेला लोकांनी शिव्यांची लाखोली वाहिली. अनिरूद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) ने साकारली आहे. त्याने आतापर्यंत नायकाची भूमिका साकारली आहे. मात्र आई कुठे काय करते मालिकेत तो थोड्या विरोधी भूमिकेतून रसिकांसमोर आला आहे.

अनिरूद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमी पोस्ट शेअर करत असतो. नुकतीच त्याची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, या घरावर माझंही नाव आहे. दुसऱ्याचा विचार न करणारी आणि दुसऱ्याच्या मनाला लागेल असं बोलणारे काही माणसं असतात, त्यातलाच हा अनिरुद्ध देशमुख. फारच उर्मट, धाकट्या भावाला वाटेल ते बोलणार, त्याच्या मनाला लागेल असं बोलणारा, फक्त चुका दाखवून द्यायच्या, मदत करायची नाही. अशी असंख्य माणसं असतात अनिरुद्ध सारखी या आपल्या समाजामध्ये, बोलताना समोरच्याच्या मनाचा अजिबात विचार करायचा नाही. त्याची काय अडचण आहे ते समजून घ्यायचं ना, आपण किती शहाणे आहोत आणि बाकीच्यांना काहीच कळत नाही असं आयुष्यभर वावरत राहायचं. मला ही अशी माणसं बरीच भेटली, आपण अडकलो असतो. आपल्याला गरज असते म्हणून गप्प बसायच, ऐकून घ्यायचं.


त्याने पुढे लिहिले की, कुणाच्या ना कुणाच्या तरी जवळच असतो. मग आपण बोललो तर आपल्याच जवळच्या माणसांना वाईट वाटेल, या भीतीने आपण उलट उत्तर द्यायची नाहीत. सगळं ऐकून घ्यायचं, पण मनाला खूप त्रास होतो, नको वाटतो त्या माणसाशी आयुष्यात कधीही संबंध ठेवायला. मी तर लांब पळतो अशा माणसांपासून, नको त्यांची तोंड बघायला आणि आपलं तोंड नको त्याला दाखवायला, आपण भले आपलं जग भलं. मी जेव्हा अनिरुद्ध देशमुखची भूमिका करतो, तेव्हा हीच माणसं माझ्या डोळ्यासमोर असतात. या सिच्युएशनमध्ये ही माणसं कसं बोलतील याचा विचार करतो आणि मग बिनधास्त बोलतो, मग काय.. खातो असंख्य लोकांच्या शिव्या, स्पेशली बायकांच्या. पण शिव्या मिळाल्या की मला आनंद होतो. म्हणजे असल्या लोकांना मला शिव्या देता आल्या नाहीत, तरी माझ्यावतीने लोक अनिरुद्धला नाही तर त्यांना शिव्या देतात असे वाटते मला.

Web Title: 'I'm glad to hear people swearing'; Discussion of actor's post in 'Aai Kuthe Kay Karte'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.