"छबूकाका ही व्यक्तिरेखा माझ्याजवळची"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 13:34 IST2017-05-18T08:04:18+5:302017-05-18T13:34:18+5:30
नकुशी तरी हवहवीशी या मालिकेतील नकुशी आणि रणजीतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. नकुशी आणि रणजीतच्या व्यतिरेखेबरोबर छबूकाका ...
"छबूकाका ही व्यक्तिरेखा माझ्याजवळची"
न ुशी तरी हवहवीशी या मालिकेतील नकुशी आणि रणजीतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. नकुशी आणि रणजीतच्या व्यतिरेखेबरोबर छबूकाका या व्यतिरेखेला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळत आहे. अभिनेते अरुण होर्णेकर यांना बाहेर फिरताना ही अनेकदा लोक छबूकाक म्हणून ओळखले जाऊ लागेल आहे. गेली अनेक वर्ष अरुण होर्णेकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अनेक भूमिका साकारल्या आहेत. मराठी रंगभूमीवरील अरुण होर्णेकर हे महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी वेटिंग फॉर गोदो, राशोमान, एक शून्य बाजीराव अशा अनेक नाटकांतूव अभिनय, दिग्दर्शन केलं आहे. अतिशय हुशार दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. गेली चार दशकं ते मराठी रंगभूमीवर निष्ठेनं काम करत आहेत. नकुशी तरी हवहवीशी मालिकेत एकटेच राहत असलेल्या छबूकाकांची मृण्मयी ही मानसकन्या आहे. या मानसकन्येचा विवाह सौरभशी होणार आहे. या लग्नासाठी नकुशी, रणजित आणि समस्त चाळकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. गंमत म्हणजे छबूकाकांनी स्वत: लग्नाची पत्रिका लिहिली आहे.
छबूकाका या भूमिकेविषयी अरुण सांगतात, 'छबूकाका ही व्यक्तिरेखा बरीचशी माझ्यासारखी आहे. त्यामुळे मला भूमिकेसाठी वेगळं असं काही करावं लागत नाही. मी प्रत्येक भूमिका आपलीशी करतो. त्यात स्वत:चं असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. छबूकाका ही भूमिका छान आहे आणि त्याच्या विविध छटा साकारताना मजा येते.' तसेच 'नकुशी' या मालिकेचा विषय वेगळा आहे. मालिकेचं कथानक कुठेही रेंगाळत नाही. दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, उपेंद्र लिमये अशी उत्तम टीमसोबत असल्यानं काम करायलाही धमाल येते. बाहेर फिरताना लोक जेव्हा छबूकाका म्हणून ओळखतात, तेव्हा छान वाटतं,' असं होर्णेकर यांनी सांगितलं.