"उद्देश उदात्त असेल तर विजय तुमचाच होतो...",'काव्या...' मालिकेच्या निमित्ताने सुम्बुल तौकीरनं व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 07:26 PM2023-10-26T19:26:46+5:302023-10-26T19:26:56+5:30

Sumbul Taukeer : 'काव्या – एक जज्बा, एक जुनून' मालिकेत सुम्बुल तौकीर खान ही गुणी अभिनेत्री काव्याच्या प्रमुख भूमिकेत आहे. ही मालिका म्हणजे सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या दृढनिश्चयी आयएएस ऑफिसरचा प्रवास आहे.

"If the purpose is noble, victory is yours...", Sumbul Taukeer expressed his opinion on the occasion of "Kavya..." series. | "उद्देश उदात्त असेल तर विजय तुमचाच होतो...",'काव्या...' मालिकेच्या निमित्ताने सुम्बुल तौकीरनं व्यक्त केलं मत

"उद्देश उदात्त असेल तर विजय तुमचाच होतो...",'काव्या...' मालिकेच्या निमित्ताने सुम्बुल तौकीरनं व्यक्त केलं मत

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’ या पुरोगामी कथेमध्ये सुम्बुल तौकीर खान ही गुणी अभिनेत्री काव्याच्या प्रमुख भूमिकेत आहे. ही मालिका म्हणजे सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या दृढनिश्चयी आयएएस ऑफिसरचा प्रवास आहे. आयएएस ऑफिसर होण्याच्या उद्देशाने प्रेरित झालेली काव्या, कठोर निर्णय घेताना डगमगत नाही आणि कसोटीच्या समयी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काम करते. सध्या चालू असलेल्या कथानकामध्ये, प्रेक्षकांना वेदनादायक भूतकाळाच्या छायेत झाकोळलेले बसंत खेडी हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याचे कठीण काम काव्या निर्भयपणे पार पाडताना दिसणार आहे. नव्या या आपल्या दिवंगत बहिणीच्या कथित निष्काळजीपणामुळे बंद पडलेल्या हॉस्पिटलशी निगडीत आठवणी असूनही, काव्या हे नुकसान भरून काढण्यासाठी कटिबद्ध आहे.
 
तथापि, तिचा मार्गदर्शक जयदीप तिला बसंत खेडी उपक्रमातून काढून टाकत तिच्या मार्गात आणखी अडचणी उभ्या करतो. आणि त्यात आणखी भर म्हणून तिचा एकमात्र विश्वासू, आदिराज प्रधान देखील तिचा विश्वासघात करत आहे, असे तिला वाटते. आदिराजचे वडील आणि राजकारणी गिरीराज प्रधान हॉस्पिटलच्या जमिनीवर कब्जा करण्याचा कट रचून काव्याला आव्हान देतील. परंतु ज्वलंत प्रश्न उरतोच: संकटांचा सामना करून काव्या विजयी होईल? या वेगवान आणि मनोरंजक मालिकेच्या आगामी भागांमध्ये याची उत्तरे आहेत.


 
सुम्बुल तौकीर खान म्हणते, मला वाटते, जेव्हा आपल्या मार्गात आव्हाने येतात तेव्हाच आपण आपले सामर्थ्य आणि योग्यता पडताळून पाहतो. हीच लवचिकता स्वप्ने बघणार्‍या दृढनिश्चयी तरुण काव्यामध्ये अवतरली आहे, जी परिस्थिती हाताळण्यात पटाईत आहे आणि अशा घटनांमधून तिची योग्यता सिद्ध होते. आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या व्यक्तींचा सामना करावा लागतो- काही व्यक्ती आपले अस्तित्व समृद्ध करतात तर काही ते उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात, अगदी आपला विश्वासघात करतात. तरीही, या अनुभवांमधून आपण धडे घेत असतो. काव्याच्या जीवनात, प्रत्येक वळणावर तिची साथ देणारा आदिराज तिचा मित्र आहे. तथापि, हे एक कटू सत्य आहे की आपल्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या व्यक्ती आपल्याला सर्वात खोल जखम देखील करू शकतात. जीवनात आपल्या मार्गात कितीही आव्हाने आली तरी त्यांच्यापासून दूर न पळता त्यांचा सामना केला पाहिजे हे मी, माझे जीवन आणि काव्या या दोन्हीकडून शिकले. शेवटी, तुमचा उद्देश उदात्त असेल तर विजय तुमचाच होतो.

Web Title: "If the purpose is noble, victory is yours...", Sumbul Taukeer expressed his opinion on the occasion of "Kavya..." series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.