n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काही महिन्यांपूर्वी दयाला मंदिरात एक छोटी मुलगी मिळाली होती आणि दया तिला घरीही घेऊन आली होती. गोकुळधाम सोसायटीमधील लोकांनी त्या चिमुरडीचे आई-वडील शोधून त्या मुलीला त्यांच्या स्वाधीन केले होते. ही खुशी गोकुळधाम सोसायटीमधील सगळ्यांचीच नव्हे तर प्रेक्षकांचीही लाडकी बनली होती. खुशी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रक्षाबंधन असल्याने आपल्यालादेखील कोणीतरी राखी बांधावी असे टप्पू, गोगी आणि गोली यांना वाटत आहे. खुशीला दयाने मुलगी मानल्यामुळे टप्पू, गोगी, गोलीला राखी बांधण्यासाठी ती येणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी खुशीला पाहून टप्पूसेनाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळणार आहे.
Web Title: I rei ii happiness
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.