मैंने प्यार किया या चिपटातील हा सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार पिया अलबेला या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 15:29 IST2017-11-11T09:59:25+5:302017-11-11T15:29:25+5:30

सूरज बडजात्या यांच्या मैंने प्यार किया या चित्रपटाला आज इतके वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील ...

I love Pyaar Ke Chitha, the audience will be seen in the series Piya Albeela in this series | मैंने प्यार किया या चिपटातील हा सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार पिया अलबेला या मालिकेत

मैंने प्यार किया या चिपटातील हा सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार पिया अलबेला या मालिकेत

रज बडजात्या यांच्या मैंने प्यार किया या चित्रपटाला आज इतके वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झाली नाही. या चित्रपटातील सुमन आणि प्रेमची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटातील अनेक गाणी आजही प्रेक्षक आवडीने ऐकतात. याच चित्रपटाने सलमान खानला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. त्यामुळे राजश्री प्रोडक्शनसाठी हा चित्रपट खूपच खास आहे. आता याच चित्रपटातील एका दृश्याची जादू प्रेक्षकांना पिया अलबेला या मालिकेत अनुभवता येणार आहे.
झी टिव्हीची पिया अलबेला ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेने नुकताच काही वर्षाचा लीप घेतला आहे. लीपनंतर तर या मालिकेच्या कथानकाला अनेक कलाटण्या मिळाल्या आहेत. या मालिकेत प्रेक्षकांना आता एक खूप छान सीन पाहायला मिळणार आहे. मैंने प्यार किया मधील टेरेस वरचा सीन आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहे. या दृश्यात लाजाळू भाग्यश्रीला सलमान खान वरील प्रेम सिद्ध करण्यासाठी शॉर्ट कपडे घालावे लागतात आणि मग ती एका मोठ्या बेडशीटमध्ये स्वतःला गुंडाळून घेते? सूरज बडजात्या हा क्षण पुन्हा एकदा त्यांच्या लोकप्रिय फिक्शन ड्रामा पिया अलबेला मध्ये निर्माण करणार आहेत. सध्या सुरू असलेल्या ट्रॅक मध्ये प्रेक्षकांनी पाहिले आहे की, पूजा म्हणजेच शीन दास एका मैफिल मध्ये मुजरा करत आहे आणि राहुल म्हणजेच अंकित व्यास, नरेनला म्हणजेच अक्षय म्हात्रेला कपूरसोबत डान्स करतानाचा खोटा व्हिडिओ दाखवतो. त्यामुळे त्या दोघांमध्ये आणखी समस्या निर्माण होतात. नरेन तो व्हिडिओ पाहून खूपच संतापतो. संतापलेला नरेन पूजाच्या सभ्यतेच्या मर्यादांची चाचणी करायचे ठरवतो. गोंधळलेली पूजा तिचा संकोच दाखवत नरेन वरील तिचे प्रेम सिद्ध करते, भाग्यश्री प्रमाणेच ती बेडशीट अंगावर पांघरून घेते. मैंने प्यार किया मधील तो फेमस सीन करायला मिळाल्याने पिया अलबेलामधील शीन दास आणि अक्षय म्हात्रे सध्या खूपच खूश आहेत. 

Also Read : अक्षय म्हात्रेची ही इच्छा पिया अलबेलामुळे झाली पूर्ण

Web Title: I love Pyaar Ke Chitha, the audience will be seen in the series Piya Albeela in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.