'हम पांच'मधली चुलबुली स्वीटी माथुर आठवतेय का? आता दिसते अशी, ओळखणंदेखील झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 03:39 PM2023-05-02T15:39:52+5:302023-05-02T15:47:03+5:30

इतक्या वर्षांत राखी विजनचा लूक पूर्णपणे बदलला आहे. इतकेच नाही तर या अभिनेत्रीला ओळखणंदेखील कठीण झाले आहे.

Hum paanch sweety mathur aka rakhi tandon look changed so much over the years see pics | 'हम पांच'मधली चुलबुली स्वीटी माथुर आठवतेय का? आता दिसते अशी, ओळखणंदेखील झालंय कठीण

'हम पांच'मधली चुलबुली स्वीटी माथुर आठवतेय का? आता दिसते अशी, ओळखणंदेखील झालंय कठीण

googlenewsNext

झी टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'हम पांच' आपण सर्वांना आठवत असेलच. माथूर कुटुंबातल्या 5 मुली आणि त्या सर्व एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत. पण या पाच मुलींमध्ये  ही सर्वात चुलबुली आणि सतत बडबड करणाऱ्या स्वीटी माथूरला  प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. कुरळे केसांची स्वीटी जी घराची बेल वाजली की गाणं म्हणत म्हणत दार उघडायची. पाच बहिणींमध्ये स्वीटी सर्वात सुंदर आणि खोडकर बहीण होती. 'हम पांच'मध्ये स्वीटीची भूमिका राखी विजान साकारली होती.

 स्वीटी माथूर आता खूप सुंदर आणि ग्लॅमरस झाली आहे.  इतक्या वर्षांत राखी विजनचा लूक पूर्णपणे बदलला आहे. ती पूर्वीपेक्षा खूपच ग्लॅमरस दिसते आहे. राखी विजानचा जन्म 21 जुलै 1977 रोजी मुंबईत झाला होता. तिने मुंबईतील बाई आव बाई फ्रामजी पेटिट गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर राखीने मुंबईच्या एमएमके कॉलेजमधून ग्रॅज्युएशनची पदवी मिळवली. 

 तिने तिच्या करिअरची सुरुवात 'देख भाई देख' या टीव्ही शोमधून केली होती. यानंतर तिला हम पांच मालिकेची ऑफर मिळाली. 'हम पांच'नंतर राखीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. देख भाई देख, बनेगी अपनी बात, बात बन जाए, सिनसिनाटी बबलाबू, हिना, हेरा फेरी, प्रोफेसर प्यारेलाल, जस्सी जैसी कोई नहीं, नागीन 4 अशा हिट मालिकांमध्ये तिने काम केलंय. छोट्या पडद्याशिवाय मोठ्या पडद्यावरही ती झळकली. क्रिश 3, मनी है तो हनी है, गोलमाल रिटर्न्स, थँक्यू, सदियां, हमको इश्क ने मारा अशा अनेक चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या

राखीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने 2004 मध्ये रवीना टंडनचा भाऊ राजीव टंडनसोबत लग्न केले. मात्र काही काळानंतर राखी आणि राजीव यांचा घटस्फोट झाला. त्याला एक मुलगी देखील आहे, जी हुबेहुब तिच्या आईसारखी दिसते. आता राखी प्रसिद्ध उद्योगपती फरीद कराचीवालाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: Hum paanch sweety mathur aka rakhi tandon look changed so much over the years see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.