छोट्या पडद्यावर रणवीर सिंग आणि वाणी कपूर कसे झाले 'ब्रेफिक्रे'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 15:14 IST2016-11-23T15:14:20+5:302016-11-23T15:14:20+5:30
वाणी कपूर आणि रणवीर सिंग यांचा बहुचर्चित बेफ्रिके सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनापूर्वीच सिनेमाला घेवून रसिकांमध्ये कमालीची ...
.jpg)
छोट्या पडद्यावर रणवीर सिंग आणि वाणी कपूर कसे झाले 'ब्रेफिक्रे'?
व णी कपूर आणि रणवीर सिंग यांचा बहुचर्चित बेफ्रिके सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनापूर्वीच सिनेमाला घेवून रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतेच रणबीर सिंह आणि वाणी कपूर यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती.यावेळीह कपिल शर्मासह वाणी कपूर आणि रणवीर सिंग यांनी धमाल करत उपस्थितांचे भरघोस मनोरंजन केले. भन्नाट प्रश्न विचारत चाहत्यांनी या दोघांना भंडावून सोडले होते. 'ब्रेफिक्रे' सिनेमातील किसींग सीन्समुळे हा सिनेमा जास्त चर्चेत आला. सिनेमाचे पहिला प्रोमो देखील पॅरिसमध्ये आयफिल टॉवरजवळ प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे सिनेमात आकर्षित करणारे लोकेशन्स, वाणी कपूर आणि रणबीर सिंगचा रोमँटीक अंदाज पाहण्यासाठी रसिक आतुर झाल्याचे पाहायला मिळतेय. सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकण्यापूर्वीच सिनेमातील गाण्यांनी सा-यांनाच वेड लावेल आहे. उडे दिल बेफिक्रे म्हणत रसिकही यांवर थिरकतांना दिसतायेत. वाणी कपूरचा बोल्ड अंदाज आणि तिच्या घायाळ करणा-या अदाही आकर्षणचा विषय ठरतोय. त्यामुळे सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकताच धुमाकुळ झालाच समजयाला हरकत नाही.
![]()