सुट्टी केवळ त्याच्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 11:05 IST2016-09-28T05:35:02+5:302016-09-28T11:05:02+5:30
नागार्जुन-एक योद्धा या मालिकेतील आबिगाईल पांडे आणि झलक दिखला जा या कार्यक्रमात सुरवीन चावलाचा कोरिओग्राफर असलेला सनम जोहर गेल्या ...
.jpg)
सुट्टी केवळ त्याच्यासाठी
न गार्जुन-एक योद्धा या मालिकेतील आबिगाईल पांडे आणि झलक दिखला जा या कार्यक्रमात सुरवीन चावलाचा कोरिओग्राफर असलेला सनम जोहर गेल्या दोन वर्षांपासून नात्यात आहेत. त्यांच्या काही मित्रांनी त्यांची ओळख करून दिली होती आणि ते नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही मालिकेत काम करत असल्याने त्यांच्यासाठी एकमेकांना वेळ देणे कठीण जाते. तरीही त्या दोघांनी चित्रीकरणातून वेळ काढून एकमेकांसोबत नुकताच वेळ घालवला. त्या दोघांनीही आपल्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणातून पाच दिवसांचा ब्रेक घेतला आणि ते दोघे गोव्याला फिरायला गेले होते. आबिगाईल सांगते, "आम्ही दोघेही मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने एकमेकांना वेळ देता येत नाही. पण तरीही आम्ही दोघे सुट्टी काढून गोव्याला गेलो होतो. तिथे आम्ही खूप मजामस्ती केली."