हॉलिडे महागात पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 12:12 IST2016-08-23T06:42:57+5:302016-08-23T12:12:57+5:30
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षराची भूमिका साकारणारी हिना खान सध्या मालिकेत दिसत नाहीये. ती एका कामासाठी अचानक दिल्लीला ...

हॉलिडे महागात पडला
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षराची भूमिका साकारणारी हिना खान सध्या मालिकेत दिसत नाहीये. ती एका कामासाठी अचानक दिल्लीला गेली असल्याचे दाखवण्यात आले आहे. अक्षरा मालिकेत नसल्यामुळे तिचे फॅन्स तिला नक्कीच मिस करत आहेत. हिना रुग्णालयात दाखल असल्यामुळे सध्या तिला चित्रीकरण करता येत नाहीये. हिना ये रिश्ता क्या कहलाता या मालिकेचे चित्रीकरण गेली कित्येक वर्षं सतत करत आहे. या चित्रीकरणातून ब्रेक घेऊन ती काही दिवसांच्या हॉलिडेवर गेली होती. हॉलिडेवरून आल्यानंतर ती पुन्हा चित्रीकरणाला सुरुवातही करणार होती. पण तिची तब्येत ढासळल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. हिनाला हा हॉलिडे चांगलाच महागात पडला असे म्हणायला काहीच हरकत नाही.