रूपाली भोसलेची होळीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 05:08 IST2016-03-11T12:08:22+5:302016-03-11T05:08:22+5:30
मार्च महिना चालू झाला की, सर्वाना वेद लागतात ते होळी व धूलिवंदनचे. लहान मुले, तरूणाई सर्वजण या उत्साहाच्या तयारीला ...

रूपाली भोसलेची होळीची तयारी
म र्च महिना चालू झाला की, सर्वाना वेद लागतात ते होळी व धूलिवंदनचे. लहान मुले, तरूणाई सर्वजण या उत्साहाच्या तयारीला लागतात. कोणता रंग घ्यायचा, किती फुगे फोडायचे, कोणत्या इव्हेंटला जायचे अशी सगळी तयारी केली जाते. मग या सणाच्या दिवशी मराठी सेलेब्रिटी तरी कसे मागे राहतील. दिल्या घरी तू सुखी रहा या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी अभिनेत्री रूपाली भोसले या अभिनेत्रीनेदेखील होळीची तयारी जोरात चालू केलेली दिसते. कारण हल्ली होळी असेल की मराठी सेलिब्रेटिंना आमंत्रित करून त्यांच्या परफार्मन्स आयोजित करून होळीचा आनंद व्दिगुणित करतात. म्हणूनच काय रूपाली भोसले हि होळीच्या गाण्यांवर सराव करताना या व्हिडीओतून दिसते.