खूपच बोल्ड लूकमध्ये निया शर्मा चाहत्यांच्या समोर आली पण एक गोष्ट विसरली....जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 05:48 PM2022-01-07T17:48:58+5:302022-01-07T17:49:19+5:30

निया शर्माचा (Nia Sharma) नवा म्युझिक व्हिडिओ लवकरच येणार आहे, ज्याचे ती प्रमोशन करण्यात सध्या ती व्यस्त आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सध्या ती प्रमोशन करत आहे.

Hold Your Breath! Nia Sharma's Jaw-Dropping Look Are Too-Hot-To-Handle | खूपच बोल्ड लूकमध्ये निया शर्मा चाहत्यांच्या समोर आली पण एक गोष्ट विसरली....जाणून घ्या

खूपच बोल्ड लूकमध्ये निया शर्मा चाहत्यांच्या समोर आली पण एक गोष्ट विसरली....जाणून घ्या

googlenewsNext

प्रसिद्धीच्या झोतात असते. याच कारणामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावे लागते. पण आता या ट्रोलिंगचा नियालाही काही फरक पडत नाही. तिला जे आवडते तेच ती परिधान करते.निया शर्माचा (Nia Sharma) नवा म्युझिक व्हिडिओ लवकरच येणार आहे, ज्याचे ती प्रमोशन करण्यात सध्या ती व्यस्त आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सध्या ती प्रमोशन करत आहे.  यावेळी तिने अतिशय बोल्ड अशी ड्रेसिंग स्टाईल केली होती. गाण्याच्या प्रमोशनसाठी निया शर्मा फिल्मसिटीमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. पण त्यावर तिने दुपट्टाच घेतला नव्हता.  

स्लिव्हजलेस ब्लाऊज आणि लेहेंग्यात ती कमालीची ग्लॅमरस दिसत होती.'एक हजारों में मेरी बहना है' फेम निया पांढऱ्या रंगाचा लेहेंगा चोलीमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. यासोबत तिने केस मोकळे सोडले आहेत. तिने कानात मोत्याचे मोठे झुमके घातले आहेत.लेहेंगा चोलीमध्ये निया शर्मा तिची फिगरही फ्लॉन्ट करत आहे. परफेक्ट फिगरमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या स्टायलिस्ट लूकमध्ये तिच्या चाहत्यांचीही नजर काही हटत नाही. तिच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्याचे पाहायला मिळत आहे. 

निया शर्माला इंडस्ट्रीत १० वर्षे पूर्ण झाली आहेत. 2010 मध्ये, तिने आपल्या करिअरची सुरुवात 'काली' या मालिकेतून केली परंतु 'एक हजारों में मेरी बहना है' या शोमधून तिला खरी ओळख मिळाली.निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर 'फुंक ले' गाण्याचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निया शर्माने तिच्या नवीन गाण्याची झलक शेअर केली आहे. निया शर्माचे नवीन व्हिडिओ गाणे पाहण्यासाठी लोक आतुर झाले आहेत.

Web Title: Hold Your Breath! Nia Sharma's Jaw-Dropping Look Are Too-Hot-To-Handle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.