सीआयडी मालिकेच्या टीमने रचला हा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 13:08 IST2018-01-29T07:38:12+5:302018-01-29T13:08:12+5:30

सीआयडी ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, एसीपी प्रद्युमन, अभिजीत, फॅड्रिक्स यांसारख्या व्यक्तिरेखा ...

History of the CID series | सीआयडी मालिकेच्या टीमने रचला हा इतिहास

सीआयडी मालिकेच्या टीमने रचला हा इतिहास

आयडी ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, एसीपी प्रद्युमन, अभिजीत, फॅड्रिक्स यांसारख्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. त्यातही दयाची दरवाजावर लाथ मारून दरवाजा तोडण्याची स्टाईल, एसपी प्रद्युमनचे कुछ तो गडबड है द्या असे म्हणणे हे प्रेक्षकांना खूप भावते. ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून या मालिकेच्या लोकप्रियतेत थोडादेखील फरक पडलेला नाही. या मालिकेने दरम्यानच्या काळात काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. पण आता ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. या मालिकेने छोट्या पडद्यावर नुकताच एक इतिहास रचला आहे. या मालिकेचे नुकतेच २० वर्षं पूर्ण झाले आहेत. कोणत्याही मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची छोट्या पडद्यावरची ही पहिलीच वेळ आहे.  
सीआयडी ही मालिका १९९८ साली सुरू झाली होती. या मालिकेत सुरुवातीपासून प्रेक्षकांना दया, एसीपी प्रद्युमन यांसारख्या व्यक्तिरेखा पाहायला मिळाल्या होत्या. या मालिकेत गेल्या अनेक वर्षांत अनेक कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. पण शिवाजी साटम आणि दयानंद शेट्टी हे सुरुवातीपासूनच या मालिकेचे भाग आहेत. तसेच आदित्य श्रीवास्तव, नरेंद्र गुप्ता, दिनेश फडणीस यांसारखे कलाकार देखील प्रेक्षकांचे प्रचंड लाडके आहेत. या मालिकेची टीम ही आता एखाद्या कुटुंबासारखी झाली आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी आजवर दिलेल्या पाठिंब्यासाठी सीआयडी या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. याविषयी या मालिकेत दयाची भूमिका साकारणारा दयानंद शेट्टी सांगतो, आजवर कोणत्याच मालिकेला इतके यश मिळालेले नाही. मी या मालिकेचा सुरुवातीपासून एक भाग आहे यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो. १९९८ पासून आम्ही सगळे एकत्र काम करत आहोत. खूपच कमी जणांना आपल्या टीमसोबत इतका वेळ घालवण्याची संधी मिळते. प्रेक्षकांनी आजवर आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा ऋणी आहे.

Also Read : सीआयडी मालिकेच्या टीममधील या सदस्याचे झाले निधन

Web Title: History of the CID series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.