म्हणून गश्मीर महाजनी बनला हीना परमारचा गुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 15:59 IST2018-03-27T08:57:53+5:302018-03-27T15:59:02+5:30

लोकप्रिय अभिनेत्री हीना परमार डिस्कव्हरी जीत वाहिनीवरील लोकप्रिय शो अंजानः स्पेशल क्राईम्स शोमध्ये आपल्या अभिनयाने सा-यांचे मनं जिंकली आहेत.हीना ...

He became the Mahamani of the Hena Parmar guru! | म्हणून गश्मीर महाजनी बनला हीना परमारचा गुरू!

म्हणून गश्मीर महाजनी बनला हीना परमारचा गुरू!

कप्रिय अभिनेत्री हीना परमार डिस्कव्हरी जीत वाहिनीवरील लोकप्रिय शो अंजानः स्पेशल क्राईम्स शोमध्ये आपल्या अभिनयाने सा-यांचे मनं जिंकली आहेत.हीना या शोमध्ये इन्स्पेक्टर अदितीची भूमिका साकारत असून ह्या शोमधील तिची भूमिकाही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.रसिकांना माझी भूमिका पसंत पडते त्याचे संपूर्ण श्रेय गश्मीर महाजनीला देत असल्याचे म्हटले आहे.हीना परमार म्हणते,“गश्मीर मित्र म्हणून अतिशय चांगला असून दुसऱ्यांना मदत करणारा सहकलाकार आहे.त्याला या क्षेत्राविषयी प्रचंड ज्ञान असून अॅक्शन दृश्ये उत्तम पद्धतीने साकारण्यासाठी तो मला योग्य टिप्स देतो.माझे पोश्चर योग्य असावे आणि फाईट सीक्वेन्सेसच्या वेळेस माझी पोझिशन बरोबर असावी यासाठी तो मला मदत करतो. त्याच्यासारखा एवढा छान सहकलाकार मला मिळाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.परफेक्ट टेक व्हावा म्हणून सीन्स इम्प्रोव्हाईज आणि डायलॉग्स पाठ करण्यासाठी वेळ द्यायला त्याला आवडतं.”लोटस टॉकीज निर्मित अंजानः स्पेशल क्राईम्स युनिट ही पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राईम थ्रिलर असून यामधून प्रेक्षकांना अनाकलनीय गोष्टींच्या जगात डोकावता येते.सुपरनॅचरलसोबत जोडलेल्या क्राईम केसेसचे इन्व्हेस्टिगेशन यात करतात आणि जे कोणाला दिसत नाहीत, त्यांना ऐकले जाऊ शकत नाही किंवा कदाचित ज्यांच्यावर कोणाचा विश्वासही बसत नाहीये अशांना न्याय मिळवून दिला जातो.

कलाकारांना ब-याचदा शूटिंगवेळी स्टंट करताना इजा होते.अशावेळी जास्त दुखापत झालेली असतानाही त्यांना शूटिंग पूर्ण करावे लागते.असेच काही अभिनेता गश्मीर महाजनीसोबत घडले.क्लायमॅक्सचे दृश्य चित्रीत करताना सेटवरील एका अपघातामुळे त्याला इजा झाली.डिस्कव्हरी जीत वाहिनीवरील पॅरानॉर्मल थरारक शो अंजानःस्पेशल क्राईम्स युनिटमध्ये इन्स्पेक्टर विक्रांतची भूमिका गश्मीर महाजनी साकारत आहे.या शोच्या शूटिंगमध्ये गश्मीर गंभीर दुखापत झाली.मुळात तो सगळे स्टंट करणे स्वतःच करतो त्यामुळे स्टंट करतेवेळी तो जखमी झाला असल्याचे कळतेय.मात्र इतकी दुखापत होवूनही त्या गोष्टीचा बाऊ न करता 'शो मस्ट गो ऑन' म्हणत गश्मीरने सर्वांना धीर देत नव्या जोमाने कामाला सुरुवात केली.

Web Title: He became the Mahamani of the Hena Parmar guru!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.