नेहाच्या खऱ्या आयुष्यातील यशला पाहिलंत का?, दिसायला आहे खूप हँडसम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 17:05 IST2022-01-22T16:56:00+5:302022-01-22T17:05:08+5:30
माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi tuzhi reshimgaath) ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय होतांना दिसत आहे. नेहा आणि यशची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते आहे.

नेहाच्या खऱ्या आयुष्यातील यशला पाहिलंत का?, दिसायला आहे खूप हँडसम
छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिकांची रेलचेल सुरु आहे. मात्र, या मालिकांच्या गर्दीत अशा मोजक्याच मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi tuzhi reshimgaath). अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade) आणि प्रार्थना बेहरे (prarthana behare) यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय होतांना दिसत आहे. नेहा आणि यशची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते आहे. तुम्ही नेहाच्या म्हणजेच प्रार्थनाच्या खऱ्या आयुष्यातील यशला पाहिलंत का ?
प्रार्थना बेहरे बऱ्याचदा सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रार्थनाचा पतीही याच इंडस्ट्रीतील असल्याची माहिती खूप कमी जणांना आहे. प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली.
प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक जावकर हे चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल म्हणून ओळखलं जातं.. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केले आहे.
मूळ 'सिंघम' चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वीच त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वतःची निर्मितीसंस्था सुरु केली.
'डब्बा ऐस पैस', 'शुगर, सॉल्ट आणि प्रेम' या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. 'मिसिंग ऑन अ वीकेंड' या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.