​इंडियन टेलिव्हिजनवरील हे इंटिमेट सीन तुम्ही पाहिले आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 14:53 IST2017-01-04T14:53:50+5:302017-01-04T14:53:50+5:30

बडे अच्छे लगते है, मर्यादा... लेकीन कब तक, सपने सुहाने लडकपन के, कितनी मोहोब्बत है, परिचय, मिले जब हम तुम, दिल मिल गये, प्यार को क्या नाम दूँ यांसारख्या मालिकेत प्रेक्षकांना इंटिमेंट सीन पाहायला मिळाले होते.

Have you seen this intimate scene on Indian television? | ​इंडियन टेलिव्हिजनवरील हे इंटिमेट सीन तुम्ही पाहिले आहेत का?

​इंडियन टेलिव्हिजनवरील हे इंटिमेट सीन तुम्ही पाहिले आहेत का?

ट्या पडद्यावरही आता इंटिमेट सीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंटिमेट सीनचा ट्रेंड छोट्या पडद्यावर सध्या चांगलाच गाजत आहे. पाहूयात छोट्या पडद्यावर गाजलेले काही इंटिमेट सीन्स...

बडे अच्छे लगते है
बडे अच्छे लगते है या मालिकेतील राम कपूर आणि साक्षी तन्वर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. मालिकेत वयाची चाळीशी पार केलेले जोडपे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या मालिकेतील साक्षी आणि रामचा लीप लॉक सीन प्रचंड गाजला होता. साक्षी आणि रामची छोट्या पडद्यावरची इमेज पाहाता त्यांच्या फॅन्सना हा सीन पाहून चांगलाच धक्का बसला होता. 



मर्यादा... लेकीन कब तक
मर्यादा... लेकीन कब तक या मालिकेने नेहमीच बोल्ड विषय लोकांसमोर मांडले आहेत. या मालिकेत गे नातेसंबंधावरदेखील भाष्य करण्यात आले होते. या मालिकेतील रिधी डोंगरा आणि राकेश वशिष्ट यांचे लव्ह सीन प्रेक्षकांना खूपच आवडले होते. 

Maryada lekin kab tak
सपने सुहाने लडकपन के 
सपने सुहान लडकपन के या मालिकेत अंकित गेरा आणि रूपल त्यागी यांनीदेखील लीप लॉक सीन दिला होता.



कितनी मोहोब्बत है
बालाजी प्रोडक्शनच्या कितनी मोहोब्बत है या मालिकेतील क्रितिका कार्मा आणि करण कुंद्रा यांची जोडी प्रेक्षकांना भावली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी या दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याने त्यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री लोकांना ऑन स्क्रीनदेखील पाहायला मिळाली होती. 


परिचय
परिचय या मालिकेत समीर सोनी आणि किर्ती नागपुरेची जोडी सुरुवातीला प्रेक्षकांना विजोड वाटली होती. या दोघांमध्ये खऱ्या आयुष्यात अनेक वर्षांचे अंतर असल्याने ही जोडी प्रेक्षकांना खटकत होती. पण काही महिन्यांनंतर त्या दोघांची केमिस्ट्री चांगलीच फुलली. मालिकेत पती-पत्नी म्हणून ते दोघे एकमेकांचा स्वीकार कधी करणार याची लोक आतुरतेने वाट पाहात होते. 

parichay serial
मिले जब हम तुम
मिले जब हम तुम या मालिकेने रती पांडे आणि अर्जुन बिजलानीला प्रसिद्धी मिळवून दिली. या दोघांमधील रोमान्स प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. 

miley jab hum tum

दिल मिल गये
करण सिंग ग्रोव्हर आणि जेनिफर विंगेट यांची दिल मिल गये या मालिकेत केमिस्ट्री खूपच छान जुळून आली होती. या मालिकेनंतरच काही महिन्यातच या दोघांनी लग्न केले होते. 

dil mil gaye

प्यार को क्या नाम दूँ
बरुण सोबती आणि सान्या इराणी यांचे प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत अनेकवेळा इंटिमेट सीन पाहायला मिळाले होते. हे सीन खूपच गाजले होते. 

iss pyar ko kya naam doon

Web Title: Have you seen this intimate scene on Indian television?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.